अण्णा झाले ट्रोल

भाग एक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. यासाठी भाजप नेत्यांनी हजारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय कृषी मंत्री कैलास चौधरी यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिध्दीत दाखल झाले होते.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात झालेली नववी बैठकही निष्फळ ठरली. शेतकऱ्यांचा एकच रेटा आहे की कृषी कायदे रद्द करण्यात यावेत आणि एमएसपी कायदा लागू करावा. पुढची बैठक ही १९ जानेवारीला होणार होती, मात्र याचदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला इशारा दिला होता.

त्यावेळी अण्णा हजारे म्हणाले की, आपण सकारविरोधात उपोषण करतो म्हणून केंद्र सरकार आपल्याशी सूडबुद्धीनं वागते की काय, असा संशय निर्माण होत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारनंही अशाच सुडाच्या भावनेनं उपोषण करून नये म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलं होतं. मात्र, हे त्यांना चांगलंच महागात पडलं. जनतेनंच त्या सरकारला धडा शिकविला. त्यामुळं आपलं कोणी काही करू शकत नाही, अशा भ्रमात सध्याच्या सरकारनंही राहू नये, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.

उपोषणासाठी जागा दिली नाही तर मागीलप्रमाणे जागा मिळेल तिथं उपोषण करीन, असं अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच उपोषणाची माहिती देण्यासाठी सरकारला आणि जागेची परवानगी मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाला पत्रं पाठविली आहेत. त्यांचे उत्तर न मिळाल्यानं अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद मोदी यांना पत्र लिहून आपण माझ्याशी सूड बुद्धीनं वागत आहात का, असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला.

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत उपोषण करायचं हा त्यांचा ठाम निर्धार होता. जिथं जागा मिळेल तिथं बसणार आहे, अशी अण्णा हजारे यांनी माहिती दिली. सरकारचे देशभर वर्चस्व वाढलेलं आहे. त्यावेळच्या सरकारप्रमाणे होणे थोडंसं अवघड आहे. या सरकारलाही तेच वाटत असेल की आमचं कोण काय करू शकतं. मात्र, मतदार हा राजा आहे. त्यांनी मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. शांतता आणि असंहिसेच्या मार्गानं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळं काहीही झालं तरी या महिन्याच्या अखेरीस आपण आंदोलन करणार, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.

३० जानेवारीपासून अण्णा हजारे उपोषणास बसणार होते. स्वामीनाथन आयोगाचे अंमलबजावणी करा, तिनही कृषी कायदे रद्द करा आदी अण्णा हजारे यांच्या मागण्या आहेत. याबाबत अण्णांनी पंतप्रधान मोदी यांना अनेक वेळा याबाबत पत्र लिहले आहे. या मागण्यांसाठी अण्णांनी दिल्लीत उपोेषणाचा इशारा दिला होता. परंतु तेथेही अण्णांना उपोषणास परवानगी दिली नाही. यामुळे अण्णांनी ३० जानेवारीपासून महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला होता. 

अण्णा हजारे यांचे मन वळविण्यासाठी भाजप नेते शुक्रवारी राळेगणसिद्धी येथे सायंकाळी दाखल झाले . केंद्रीय कृषीमंत्री कैलास चौधरी,  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची भेट घेतली. सर्व नेत्यांनी अण्णांच्या प्रकृतीची विचारपूस करुन त्यांच्याशी चर्चा केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर, सोशल मीडियातून आणि काही नेत्यांकडूनही अण्णांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनामुळे अण्णांनी सुचिवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता, अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोजित करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील. समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील.

अण्णा आणि फडणवीस भेटीनंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, अण्णांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सोशल मीडियातून चर्चिले जात आहे. यासंदर्भात अण्णांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर उत्तर देताना जसा ज्याचा चष्मा तसं त्याला दिसेल, असे उत्तर अण्णांनी दिलंय. ”मला एक महत्त्वाचं वाटलं, उच्चाधिकार समितीमध्ये सरकारचे आणि आमचे, या दोन्ही बाजुचे तज्ज्ञ घ्यायचं ठरलंय. तसेच, आम्ही जे 15 मुद्दे शेतकऱ्यांच्या हिताचे दिले होते, ते मुद्दे स्विकारत या मुद्द्यांवर उच्चाधिकार समितीमध्ये चर्चा होणार आहे. आता, हे आयोगासमोर जाण्यापूर्वी या उच्चाधिकार समितीमध्ये आमच्याही तज्ज्ञ मंडळींकडून सूचना व पाहणी होईल. त्यानंतर, अंतिम अहवाल आयोगाकडे जाईल. चुकीच्या गोष्टीला आमचे लोकं विरोध करतील,” असे अण्णा हजारे यांनी सांगितले.

सरकारकडे आपली जी मागणी होती, त्यासंदर्भात केंद्राच्या कृषीमंत्र्यांशी आणि इतरांशी चर्चा झाली, त्यानंतर मला आश्वासन दिलं. यासंदर्भात, अण्णांनी उपोषण घेतल्यामुळे तुमच्या विश्वासर्हतेवर काही परिणाम होईल, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न अण्णांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मला वाटत नाही, आणि मला काही फरक पडत नाही. कारण, 100 टक्के लोकांचं मी समाधान करु शकत नाही. ज्या रंगाचा चष्मा, त्या रंगाचं जग दिसतं अस उत्तर अण्णांनी दिलं आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२९.०१.२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *