कंधार ; प्रतिनिधी
साठेनगर येथील भाजपा युवा नेते महेश मोरे यांच्या निवास स्थानीलोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या जि.प.सदस्या भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा, शिक्षक प्रकोश सौ प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांनी
श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित अभियानात सहभाग नोंदवून साठेनगर ,प्रियदर्शनी नगरामध्ये भेटी घेवून चर्चा केली.
कंधार लोहा विधानसभा मतदार संघाच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी समर्पित अभियानात चालु असून त्या अभियानात जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर सहभागी होऊन साठेनगर,प्रियदर्शनी नगर सह परीसरातील घरी जाऊण निधी संकलन केले.भाजपा महीला जिल्हा उपाध्यक्षा सौ.चित्ररेखा गोरे आदीसह भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष ॲड.गंगाप्रसाद यन्नावार,महेश मोरे ,राजहंश शहापुरे, सागर डोंगरजकर आदीसह यावेळी सोबत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.