ता.प्र.(कंधार)
कंधार येथील मानवा जागी हो कार्यक्रमा अंतर्गत माझे कुटुंब माझी जबाबदारी कोरोना विषयक जण जागरण कार्यक्रम दि.१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ बाजार पेठेत शाहीर सीताराम जोंधळे यांच्या कालासंचच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून उस्फुर्त प्रतिसाद दिला .
या बाबत सविस्तर वृत्त असे की,जिल्हा माहिती कार्यलय नांदेड माहिती व जनसंपर्क महासंचनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत मानवा जागी हो माझे कुटुंब माझी जबाबदारी सहभागी होऊ काळजी घेऊ हा कार्यक्रम दि.१ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ बाजार पेठेत शाहीर सीताराम जोंधळे यांच्या जन सेवा पथक पानभोसी कालासंचच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी नागरिकांनी या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर सीताराम जोंधळे,विठ्ठल कुंकुलवाड (ढोलकी वादक),गायिका गंगुताई गोरे,गायिका वंदना सुर्यवंशी,श्रीनिवास कुंकुलवाड,देविदास जाधव,ओमकार गडमवाड,बालाजी सोनटक्के, केरबाजी गच्चे (पेटी मास्तर),सारनाथ जोंधळे इत्यादींनी परिश्रम घेऊन नागरिकांत कोरोना विषयक माहिती व सल्ला आणि गोदावरी नदी पत्रात झालेले प्रदूषण दूर करण्यासाठी जगृती बाजार पेठेत केली.