कंधार ;प्रतिनिधी
शहरात 31 जानेवारी 2021 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम चालू झाली असून कंधार शहरात 3 हजार 416 लाभार्थ्यांना 21 बूथ वरून पोलिओ पाजण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सूर्यकांत लोणीकर यांनी दिली आहे .
सदरील पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंधार ग्रामीण रुग्णालयात झाला आहे. एकूण 3 हजार 773 लाभार्थी 0 ते 5 वयोगटातील बालके असून त्यापैकी पहिल्या दिवशीच 90.1 53 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाली असल्याची माहिती बालाजी कल्हाळे यांनी दिली आहे.