नांदेड – प्रतिनिधी
येथील हरहुन्नरी चतुरस्त्र पत्रकार राम तरटे आणि कवी राम गायकवाड यांचा सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, जिल्हा पदाधिकारी गोविंद बामणे, रणजीत गोणारकर, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, दत्ता कोंपलवार आदींची उपस्थिती होती.
सिंधी ता. उमरी येथे भरलेल्या पंधराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष डॉ. भगवान अंजनीकर, उद्घाटक माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, स्वागताध्यक्ष संगिता पाटील डक, भगवान पाटील शिंदे, प्रभाकर कानडखेडकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, संजय कुलकर्णी, मारोतराव कवळे गुरुजी, पांडूरंग देशमुख गोरठेकर, रविंद्र चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राम तरटे यांना उत्कृष्ट पत्रकारिता यासाठी आणि ‘गबाळगुंज’ या कवितासंग्रहासाठी कवी राम गायकवाड यांना राज्यस्तरीयलोकसंवाद पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. याचेच औचित्य साधून रविवारी सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
राम तरटे आणि गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाचे पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, एकनाथ कार्लेकर, सुभाष लोखंडे, प्रकाश ढवळे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.