कंधार ; प्रतिनिधी
संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समितीच्या कंधार तालुका अध्यक्षपदी श्रीराम जाधव यांची तर सचिव पदी सुनिल राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन करता यावे म्हणून आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी कंधार येथील शासकीय विश्रामगृह येथे बंजारा समाजातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी श्रीराम जाधव यांची तर सचिवपदी सुनील राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव दरवर्षी बंजारा समाजाच्या वतीने कंधार तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते .विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी covid-19 च्या प्रादुर्भाव पाहता संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्सव कसा साजरा करायचा त्यानुषंगाने आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण ,भाजपा कंधार तालुका अध्यक्ष भगवान राठोड, सुंदर सिंग जाधव, सुरेश राठोड, मेहरबान पवार यांच्यासह बंजारा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते समितीच्या अध्यक्षपदी श्रीराम जाधव यांची तर सचिवपदी सुनील राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे अशी माहिती सुरेश राठोड यांनी दिली आहे.