प्रसार माध्यमाची सत्ताधाऱ्यांकडून होणारी गळचेपी थांबली पाहिजे -डी.पी.सावंत

कंधार मध्ये पत्रकार पुरस्कारांचे वितरण

कंधार ; प्रतिनिधी

समाजातील सर्वसाधारण माणसाचे प्रश्न सोडवण्याचे काम प्रसारमाध्यमाकडून केले जाते. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब आहे. त्या खांबाला सत्ताधारी मंडळीकडून सुरुंग लावले जात आहे व त्यांची गळचेपी केली जात आहे. ती थांबवून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकारांना जनतेनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी केले.


येथील संत नामदेव महाराज सभागृहात रविवार दुपारी हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापनदिनानिमित्त कै दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.मनोहर धोंडे हे होते तर उदघाटक म्हणून गुरुवर्य संत एकनाथ नामदेव महाराज हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे, एकनाथ मोरे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार, बालाजीराव पाडांगळे, पंढरीनाथ बोकारे, नायब तहसीलदार विजय चव्हाण,डाॕ. श्याम पाटील तेलंग हे उपस्थित होते.


यावेळी देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख अनिल कसबे, गोदतीरचे जिल्हा प्रतिनिधी पंढरीनाथ बोकारे, देशोन्नतीचे कंधार तालुका प्रतिनिधी अड. दिगंबर गायकवाड, सकाळचे लोहा बातमीदार बा. पु. गायखर, मुखेड तरुण भारतचे प्रतिनिधी चंद्रशेखर पाटील यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.


पुढे बोलताना डि.पी.सावंत म्हणाले की,पत्रकार हा लोकशास्तंभचा चौथा स्तंभ असुन त्याला जिवंत ठेवण्याचे काम समाजाने केले पाहिजे. ग्रामीण भागातीत हिंदवी बाणा या वृत्तपत्राने अधुनिकता जपत सध्याची गरज ओळखुन हिंदवी बाणा लाईव्ह चालु करुण होणाऱ्या घडामोडीवर लक्ष ठेवुन आरसा समोर ठेवला आहे.यातच पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यामुळे पत्रकार यांच्या समोर अनेक आव्हान आहे. अशा आव्हान पेलणाऱ्या पत्रकारांचा गौरव झाला पाहीजे या उद्देशाने संपादक माधव भालेराव यांनी पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे अयोजन केले आहे. तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांचा पुरस्कारांने सन्मान करणे हे खुप मोठे कार्य आहे.येणाऱ्या काळात ही हा पुरस्कार सोहळा खंडीत न होत अंखड चालत राहावा असे प्रतिपादन ही डि.पी.सावंत यांनी केले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे बोलताना म्हणाले की, वृत्तपत्र काढणे सोपे असले तरी त्या चालवणे खुप कठीण आहे.अशा परिस्थितीत ही तालुक्याच्या ठिकाणी एखादे वृत्तपत्र चालवणे खुप मोठी बाब आहे. सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे. ही नाडी ओळखूनच हिंदवी बाणा लाईव्हची निर्मिती झाली आहे.पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा असुन देशाचे सरकार हलवण्याची ताकत ही पत्रकांरानमध्ये आहे. प्रखड व निर्भिड पत्रकारांचा गौरव झाला पाहीजे, या उदेशाने हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापण दिना निमीत्य कै.दुर्गादास सरफ पत्रकार प्रतिष्ठाणच्या वतिने पुरस्कार देऊन सन्मान करण्याच काम केलं आहे.


उदघाटक गुरुवर्य एकनाथ नामदेव महाराज यांनी आशीर्वादरुपी मनोगत व्यक्त केले. तर अनिल मोरे, अरविंद नळगे, बालाजी पांडागळे, पंढरीनाथ बोकारे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दिगंबर वाघमारे यांनी केले. सुत्रसंचलन वैजनाथ पांचाळ यांनी केले तर आभार गणेश कुंटेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिर्झा जमीर बेग, प्रा. भागवत गोरे, प्रा. सुभाष वाघमारे, महोमद सिकंदर, एस.पी. केंद्रे, प्रा. जमील बेग, पांढरी केंद्रे, हणमंत मुसळे, सौ. अर्चना भालेराव यांच्यासह आदींनी पतिश्रम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *