दोन कोटी 45 लक्ष रुपये कामाच्या पूलकम बंधाऱ्याला शासनाची प्रशासकीय व आर्थिक मान्यता– आमदार शामसुंदर
कंधार (प्रतिनिधी)
कंधार तालुक्यातील कौठा येथील पुलकम बंधाऱ्याला अखेर शासनाने प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली असल्याने लोहा ,कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या सततच्या तळमळीच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी ही माहीत दूरध्वनीवरून आ . श्यामसुंदर शिंदे यांना काल सोमवारी दिली असल्याचे आ. शिंदे यांनी बोलताना सांगितले, कंधार तालुक्यातील कौठा येथील पूल कम बंधाऱ्याला शासनाने नुकतीच प्रशासकीय व आर्थिक मान्यता दिली असल्याने कौठ परिसरातील शेकडो हेक्टर जमिनीला याचा मोठा लाभ होणार आहे, .
कौठा येथील पूल कम बंधाऱ्याला शासनाने 2 कोटी 45 लक्ष रुपयांच्या आर्थिक निधीची मंजुरी दिली असल्याचे ही आमदार शिंदे यांनी बोलताना सांगितले. आ. शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ,बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण, यांच्याकडे आमदार शिंदे यांनी हा बंधारा होण्यासाठी व प्रशासकीय मान्यता व आर्थिक मान्यता मिळविण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी आमदार शिंदे यांनी तळमळीने पाठपुरावा केला होता. शासनाने कंधार तालुक्यातील कौठा पूलकम बंधाऱ्याला नुकतीच प्रशासकीय मान्यता दिल्याचे पत्र दिले असून या बंधाऱ्याच्या कामासाठी 2 कोटी 45 लक्ष रूपये निधी खर्च करण्यासाठी आर्थिक मान्यता दिली असल्याने लोहा ,कंधार चे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे आभार व्यक्त केले असून आ. शामसुंदर शिंदे यांनी आपल्या आमदारकीच्या सव्वा वर्षाच्या काळात मंत्रालय स्तरावरून लोहा, कंधार मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सव्वा वर्षांच्या अल्प कालावधीत कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणण्यात आ .शामसुंदर शिंदे हे वेळोवेळी यशस्वी होत असल्याने मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आ.शामसुंदर शिंदे यांचे लोहा, कंधार तालुक्यातील जनतेतून अभिनंदन होत आहे. कंधार तालुक्यातील कौठा येथील पूल कम बंधाऱ्याला शासनाची प्रशासकीय मान्यता मिळवून आणण्यात व 2 कोटी 45 लक्ष रु निधी मिळून आणण्यात अखेर आ. शामसुंदर शिंदे यांना यश आले असल्याने आ. शिंदे यांचे लोहा ,कंधार मतदार संघातील जनतेतून अभिनंदन व कौतुक होत आहे.