धानोरा कवठा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवड बिनविरोध ; सरपंच म्हणून अंजनाबाई बाबाराव हत्ते तर उपसरपंच शिवनंदा शिवराज जाधव यांची निवड

कंधार ; प्रतिनिधी

धानोरा कवठा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असून सरपंच पदी अंजनाबाई बाबाराव हत्ते, व उपसरपंच पदी शिवनंदा शिवराज जाधव यांची गावकऱ्यांच्या वतीने सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

त्या वेळी भूमी उपअधीक्षक अभिलेख अधिकारी श्री प्रमोद माळी यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली.

धानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच :-अंजनबाई बाबाराव हत्ते उपसरपंच_ शिवराज आनंदराव जाधव यांनी पदाचा
(बिनविरोध) पदभार स्वीकारला..

येणाऱ्या ५ वर्षात गावचा चेहरामोहरा बदलून टाकनार,
धानोरा गावचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर सुंदर गाव म्हणून झळकविल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही ..धानोरा गावातील माय बाप जनतेने ९ पैकी ७ जागा जिंकून देत आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला नेहमीच पात्र राहणार .असल्याचे सांगितले तसेच
पदाचा कार्यभार स्वीकारल्यामुळे गावातील माय बाप जनतेने आमच्या जनशक्ती ग्रामविकास पॅनल च्या सर्व सदस्य यांना आशीर्वाद रुपी सत्कार केला.

त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी मंडळी धानोरा (कवठा) उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *