कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील बिजेवाडी ग्रामपंचायतीवर सरपंच व उपसरपंच म्हणून महिलांची निवड झाली आहे. दिनांक 12 रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सरपंच म्हणून रेखा विपिन जाधव आणि उपसरपंच म्हणून आशाताई गजानन डांगे यांची बिनविरोध निवड केली आहे.
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी कंधार तालुक्यातील बिजेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत गोणारे, तलाठी ग्रामसेवक रमेश राठोड, सुरेश राठोड, मारोती डांगे, बालाजी आदमपुरे,कामाजी कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये सदरील निवडीची बैठक घेण्यात आली.यामध्ये सरपंच व उपसरपंच जाहीर करण्यात आले.
बिजेवाडी ग्रामपंचायत ही 7 सदस्यांची आहे. श्रीराम लालू जाधव व लक्ष्मण खेमा जाधव यांच्या दोन पॅनल मध्ये अटीतटीची लढत निवडणुकीत झाली. त्यात लक्ष्मण खेमा जाधव यांच्या पँनलने बाजी बाजी 5 सदस्य निवडून आले तर 2 सदस्य से श्रीराम जाधव यांच्या पँनलचे निवडले.
आरक्षणामध्ये सरपंच पद ओपन महिलांसाठी आरक्षित झाले होते. त्यामुळे दिनांक 12 रोजी प्रत्यक्ष सरपंच व उपसरपंच घोषित करण्यात आले. सरपंच पदी रेखा विपिन जाधव तर उपसरपच म्हणून आशाताई गजानन डांगे यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.