घोडज ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी सौ. कुंता ज्ञानेश्वर पा .चोंडे तर उपसरपंच म्हणून सौ. महानंदा लाडेकर यांची निवड
कंधार (प्रतिनिधी)
कंधार तालुक्यतील महत्वाची समजली जाणाऱ्या घोडज ग्रामपंचायतिच्या सरपंच पदी सौ. कुंता ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांची तर उपसरपंच पदी सौ. महानंदा लाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ,कंधार तालुक्यातील घोडज ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जात होती, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, आमदार शामसुंदर शिंदे यांचे अत्यंत विश्वासू तथा कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांनी घोडज ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे,
कंधार तालुक्यात राजकीय दृष्ट्या वजनदार व्यक्तिमत्व म्हणून कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांची ओळख आहे. घोडज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कं. कृ. उ .बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांनी आपल्या कार्याच्या जोरावर घोडज ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे ,सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांच्या सौभाग्यवती सौ. कुंता ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी सौ. महानंदा लाडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
आठ सदस्य असलेल्या घोडज ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून सौ. मीना नागोराव लाडेकर, श्रीमती. शोभाताई ग्यानोबा कांबळे, सौ. कुशावर्ताबाई आबाराव घोडजकर, सौ. महानंदा आनंदराव टोकलवाड, सौ. वंदना जीवन राठोड, सौ .कुंताबाई सुधाकर केंद्रे हे नवनिर्वाचित सदस्य आहेत,
कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे यांनी घोडज ग्रामपंचायतीवर एक हाती विजय संपादन केल्याबद्दल नवनिर्वाचित सरपंच सौ. कुंता ज्ञानेश्वर पाटील चोंडे ,उपसरपंच सौ. महानंदा लाडेकर ,घोडज ग्रामपंचायतीचे किंग मेकर तथा कंधार बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील , जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे ,कंधार बाजार समितीचे उपसभापती अरुण पाटील कदम, लोहा खरेदी-विक्री संघाचे सभापती स्वप्नील पाटील उमरेकर , उपसभापती शाम अन्ना पवार , यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .