कंधार ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मिर्झा जमीर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12 फेब्रुवारी रोजी कंधार तालुका पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.
कंधार तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली त्याबद्दल सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी नुतन तालुका अध्यक्ष सचिन मोरे, सचिव डॉक्टर दिनकर जायभाये, विनोद तोरणे, सय्यद हबीब यांचा सन्मान करण्यात आला.
दिगंबर वाघमारे, हनुमंत मुसळे, प्रा.भागवत गोरे,प्रा. सुभाष वाघमारे,हिंदवीबाणा संपादक माधव भालेराव, मोहम्मद सिकंदर, शिवाजी सुरडकर आदींची या वेळी उपस्थिती होती.
पत्रकार हा समाजाचा कणा असून तो समाजाला अविरतपणे न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असतो, मतभेद न करता समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचे कार्य करावे व करत रहावे असे आव्हान या वेळी पत्रकार प्रा. भागवत गोरे यांनी सत्कार प्रसंगी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर वाघमारे यांनी तर आभार हनुमंत मुसळे यांनी मानले.