कंधार ;प्रतिनिधी
लोकप्रीय लोकनेते नांदेड जिल्ह्याची खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या आशिर्वादाने शेकापुर ग्राम पंचायती मधे प्राचार्य किशनरावजी डफडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करण्यात आली.सरपंच पदी सौ.मीराताई संजय भुस्कटे व उप सरपंच पदी मोरेश्वर गोविंदराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दि.12 फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सरपंच ,उपसरपंच निवड करण्यात आली.त्यावेळी शेकापुर ग्राम विकास पँनल चे प्रमुख प्राचार्य किशनरावजी डफडे ,माजी सरपंच बालाजीराव पाटिल डफडे, तंटामुक्ती अध्यक्ष राजीव पाटिल डफडे,मदन भाऊ कल्याणपाड, गंपु पाटिल केंद्रे,सुनिल पाटिल डफडे,बालाजी भुस्कटे,धनराज पाटिल डफडे,विनायक भुस्कटे,सूर्यकांत पल्लेवाड,नागोराव पाटिल केंद्रे,माधव वाघमारे, बालाजी वाघमारे,विट्ठल गायकवाड,केशव कदम व गावातील सर्व तरून बांधव उपस्थीत होते.सरपंच ,उपसरपंच व सदस्याचा यावेळी सत्कार करण्यात आला.