नांदेड ; प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन व अभ्यास केंद्रास मान्यता देण्यात यावी या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मंत्री महोदयांनी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अध्यासन व अभ्यास केंद्र उभारण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर,माजी आमदार अविनाश घाटे,शिवसेनेचे दत्ता भाऊ कोकाटे,उमेश भाऊ मुंडे,महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य शिवा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापुरकर, युवक काँग्रेस सरचिटणीस संजय गोटमुखे, दलित मित्र एम. बी.उमरे,सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर बंडेवार, डाॅ.लखन कत्तेवार,लसाकमचे जिल्हा सचिव प्रा. डाॅ. अशोक झुंजारे, मनेश खटावे, शिवसेना युवा सेनेचे अभिजित भालके, शिवसेनेचे शहर समानव्यक भारत सरोदे, बी. एम. कांबळे आदींची उपस्थिती होती.