माजी सैनिक संघटनेचा पुढाकार
कंधार ; प्रतिनिधी
पुलवामा आतंकवादी हल्ल्यास 14फेब्रुवारी रोजी दोन वर्ष पुर्ण होत असल्याने माजी सैनिक संघटनेच्या वतिने श्रध्दांजलीचे अयोजन करण्यात आले होते.
या हल्यात शहिद झालेल्या जवानांना स्मरणार्थ भारतमाता की जय, अमर रहे …शहीद जवान.. अमर रहे… असे नारे देत कंधार येथिल मिलटरी कँप येथिल विद्यार्थी प्रशिणार्थी ,एनसीसी स्टूडण्ट ,माजी सैनिक आदीची शहरातून रँली काढण्यात आली होती.
श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले,नगरसेवक शहाजी नळगे,गणेश कुंटेवार,परमेश्वर जाधव,माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड,पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.दिगांबर गायकवाड ,जिल्हा सहसचिव दिगांबर वाघमारे ,मिर्झा जमिर बेग,एस.पी.केंद्रे ,माधव भालेराव ,महंमद सिंकदर,आदी मान्यवरासह माजी सैनिक संघटनेचे
आनंद नवघरे, तालुकाध्यक्ष अर्जुन कांबळे, उपाध्यक्ष शेख अजिज , सचिव पोचीराम वाघमारे, सहसचिव गोविंदराव सूर्यवंशी, संघटक बापूराव कल्याणकर! माणिकराव देवकते, बापूराव शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, माधव नवघरे ,गोविंद जायभाये, उमाजी पंदलवाड ,गोविंद शिवाजी कवठाळे ,बालाजी वाघमारे,हनुमंत केंद्रे ,मारुती कागणे आदीची यावेळी उपस्थिती होती.