कंधार ;प्रतिनिधी
भाजपा मा. ता. अध्यक्ष वेंकट गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळांतवाडी ता. कंधार ग्रामपंचायत निवडणुकीत मा. सरपंच मोहन पाटील जाधव यांच्या पॅनलने 7 पैकी 5 जागा जिंकून घवघवीत यश संपादन केले.
दिनांक 14/02/ 2021 रोजी भाजपा मा. ता. अध्यक्ष वेंकट गव्हाणे, नवनाथ पाटील तोरणे, मोहन पाटील जाधव, व नवनिर्वाचित सरपंच सौ. पंचफुलाबाई शंकराव जाधव , व उपसरपंच सुंदरबाई शेषराव वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष केशव पाटील जाधव, वकील रमेश डोळेवार यांनी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांची भेट घेतली खासदार साहेबांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्वांचा शाल हार देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.