कंधार ; प्रतिनिधी
दि.15 फेब्रुवारी 1739 रोजी जन्मास आलेल्या राष्ट्रसंत बंजारा भुषण सुवालाल महाराजांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपली उभी हयात खर्च केली.आज घडीला बंजारा समाज त्यांना आदर्श मानतो.त्यांच्या जन्मास 282 झाली.ते या जगात नसले तरी ते विचाराने भारतीय समाजातच नव्हे संपुर्ण विश्वात आजही जाज्वल्य विचाराने जिवंत वाटतात. पृथ्वीतलावर ज्या-ज्या लोकांनी आपले साम्राज्य निर्माण केलेहोते.ते कोणीही देव नव्हते देवता किंवा दैवी अवतार नव्हते.हाच वैचारिक वारसा सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजा पुढे मांडला.18 व्या शतकात भारतात बंजारा समाजात क्रांतिकारक सेवालाल महाराजांचा जन्म झाला.सेवालाल महाराज यांनी समाज, देशाला उद्देशून सांगीतलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत.जाणत ,छानजो,पाच मानत म्हणजे कोणतीही बाब माहिती करुन घ्या,शिकुन घ्या,त्यास पडताळून पहा नंतरच त्याचा अवलंब करा.
आयएसआय काळेम रुईया कटोरा पाणी पकीये(येत्या काळात रुपयाला तांबा भरुन पाणी मिळेल.केणो भजो मत,पुजो मत,मुलांना शाळेत शिकवा असा मौलीक संदेश सेवालाल महाराज यांनी दिला.सेवालाल महाराज हे काल्पनिकतेच्या विरोधात होते.त्यांनी सांगीतलेला विचार सध्याच्या वर्तमानकाळात सत्य वाटत आहे,नव्हे सत्य झालाच आहे. सेवालाल महाराज यांनी 250 वर्षापुर्वी बंजारा समाजाला हा विचार सांगीतला. बंजारा समाज हा निसर्गावर नितांत जीव लावणारा समाज आहे. नैसर्गिक बाबींना पुजणारा आहे.ज्ञान-विज्ञानाची कास धरण्याची प्रेरणा युवा पिढीला संत सेवालाल महाराजांनी दिली आहे.
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीत कंधारची मातृशाळा म्हणजे श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या ज्ञानालयात संस्थेचे संस्थापक व संचालक, विद्रोही विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार मा.डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या समर्थ हस्ते राष्ट्रसंत सुवालाल महाराज यांच्या छायाचित्रास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर,उपमुख्याध्यापक रेणके सर,ज्युनियर विभागाचे प्रमुख प्रा.सदानंद कांबळे सर,पर्यवेक्षक रमाकांत बडे सर, महिला प्रतिनिधी धोंडगे मॅडम,उल्हास राठोड मामा यांनी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या छायाचित्रास गुलाबपुष्प अर्पण केले.या कार्यक्रमास प्रा.शेट्टे सर,प्रा.वडजे सर,प्रा.कौसल्ये सर,प्रा.अक्कनगीरे सर,प्रा.मुनीर सर,आकुलवाड सर,चिवडे सर,अझर बेग सर,संग्राम जाधव सर,जायभाये सर,अन्नकाडे सर,अल्लडवार सर,कदम सर,रणभिडकर सर,बंडेवार सर,
कानिंदे मॅडम,चिंतेवार मॅडम, सफदर पठाण,अशोक कांबळे मामा आदी जण उपस्थित होते.प्रा.संग्राम कोसल्ये सर यांनी उत्कृष्ट सुत्रसंचलन केले.