जगतगुरू संत सेवालाल महाराज यांना अभिवादन.


अहमदपूर ( प्रतिनिधी प्रा.भगवान अमलापुरे ) जगतगुरू संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंती निमित्त येथील पंचायत समिती कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.


सकाळी १० : ३० वाजता, पंचायत समिती कार्यालयातील छत्रपती शिवाजी राजे सांस्कृतिक सभागृहात जगतगुरू संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले.


यावेळी माजी मंत्री तथा अहमदपूरचे मोठे साहेब बाळासाहेब जाधव, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्था एन डी राठोड, अध्यक्ष सम्राट मित्रमंडळ अहमदपूर अशोकराव सोनकांबळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी सोनकांबळे, ए के आभंदे, कनिष्ठ सहाय्यक निखिल पांचाळ, पपुलवाड साहेब, प्रा भगवान आमलापूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *