कंधार ; प्रतिनिधी
प्रशासन आपल्या गावी या उपक्रमांतर्गत कंधार तालुक्यातील पेठवडज मंडळ मध्ये सर्व तालुका प्रशासकीय अधिकारी व क्षेत्रीय स्टाफ, ऑफिस कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
प्रशासन आपल्या गावी उपक्रमास पेठवडज येथे भरभरुन प्रतिसाद मिळाला असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले अशी माहीती तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.
पेठवडज येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सरपंच पदावर असलेल्या श्रीमती गायकवाड या महीलेच्या हस्ते श्रीफळ फोडून महीलांना सन्मान कंधार तालुका प्रशासनाकडून देण्यात आला.तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले व 10 डोळ्यासंबंधीत मोफत ऑपरेशन करीता मोफत उदगीरला रवाना करण्यात आले.
कार्यक्रमाचे काही फोटो व क्षणचित्रे जिल्हाधिकारी कार्यालय व्हाट्सअप ग्रुप वर टाकले होते. आपल्यासारखेच अनेक तालुक्यांनी देखील फोटो टाकले होते परंतु आपल्या आजच्या कार्यक्रमाची जिल्हाधिकारी डॉ .विपीन इटनकर यांनी विशेष नोंद घेऊन कौतुक केले अशी माहीती तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.
यावेळी गटविकास अधिकारी बळवंत, नायब तहसीलदार विजय चव्हाण, पुरवठा तहसिलदार एस.व्ही.ताडेवाड, बारकुजी मोरे,पेशकार जोंधळे, पानपट्टे, आदीसह सर्व तालुकास्तरावरील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.