मराठी राजभाषा दिनी मराठी भाषेचे”बोलके शल्य” शल्यकार-गोपाळसुत, दत्तात्रय एमेकर गुरुजी

कंधार
सध्याच्या वर्तमान युगी दररोज कोणता ना कोणता तर दिन विशेष असतो.वर्षाचे ३६५ दिवस ही सतत सुरु असतो.त्यातच आज माझा दिवस म्हणजे राजभाषा मराठी दिन दि.२७ फेब्रुवारी २०२१ साजरा होतो खरा,पण माझ्या मनी जे शल्य आहे.हे शल्य माझ्या मनातले सुंदर अक्षर कार्यशाळेचे संचालक दत्तात्रय एमेकर गुरुजीनीं शब्दबध्द करुन माझ्याशी संवाद साधून लिहिले आहे,त्यांना माझ्या वतीने धन्यवाद माझी परिस्थिती कोण जाणून घेणार?माझी होत असलेली कुचंबना कोण रोखणार?माझे खरे तारणहार कोण आहेत?असे अनेक प्रश्न मला दिवसेंदिवस भेडसावत आहेत.आज माझा दिवस हा प्रख्यात साहित्यिक वि.वा.शिरवाडकर यांची जयंती निमित्त साजरा करतात.

फक्त सामाजिक माध्यमातून, वर्तमानपत्र पत्रातून, अनेक प्रसार माध्यमातून गवगवा करुन एकमेकांना सदिच्छा देवून माझ्यावर पुतणा मावशीसम प्रेम दाखवतात.सध्या राजकिय क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात दिग्गज असले तरी गोर्‍ह्या साहेबांच्या इंग्रजी भाषेवर प्रेम करतात.मला मात्र सावित्रीबाई वागणुक देत नामानिराळे होतात.जागतिक राजभाषा मराठी दिनक सदिच्छा देण्याची जणु स्पर्धाच लागली दिसते.पण ३६४ दिवस माझ्यावर अन्याय करतात.हे मला समजत नाही असे नाही.मला समजत असलेतीरी काय उपयोग? झोपलेल्यांना उठवता येते,मात्र मिज घेतलेल्यांना कसे उठवायचे!हा यक्ष प्रश्न मला वारंवार पडतो…..पण मी निरुत्तर होतो.मला ज्या शाळेत किमंत आहे त्या शाळेत मोफत शिक्षणाची अपेक्षा करणारे मात्र,भरमसाठ फिस देवून इंग्रजी शाळेत दाखला देतात.ही वस्तुस्थिती माझ्या महाराष्ट्रात आहे.याची खंत मला वाटते आहे.मी जन्मजात प्रत्येक जणांच्या रसनावर रेंगाळत असलो तरी…..इंग्रजीत संभाषण करणार्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते आहे,पण माझ्यावर प्रेम करणाऱ्यास अगदीच दुय्यमस्थानाचे जिण जगावे लागत आहे.मायबोली मराठी भाषेवर राजकारण करणाऱ्यांची पाल्य इंग्रजी माध्याच्या शाळेत प्रवेश घेवून माझ्यावर स्वार्थी बेगडी प्रेम करुन जनतेस वेठीस धरतात.आणि म्हणतात मराठीत नावाच्या पाट्या पाहिजे!पण स्वाक्षरी मराठीत पाहिजे!ग्राहक केंद्रावर मराठी भाषेचा आग्रह अशी अनेक ठिकाणी माझा आग्रह धरुन आपली राजकीय पोळी भाजुन घेतात.खरच तस पाहिल्यास मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण असते पण…..महाराष्ट्रात मात्र इंग्रजीत लिहिणे,बोलणे,वाचणे हे प्रतिष्ठेचे ठरते.

भाषा शिकणे गैर नाही.पण आदर्श असतांना अनेक ज्ञानग्र॔थ उपलब्ध असतांना हट्ट इंग्रजीचा का?संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली तो ग्रंथराज वारकरी पंथात नव्हे संपुर्ण मानव जातीला मार्गदर्शक आहे.जगतगुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली त्यातले अभंग आजही समाजाला प्रबोधनात्मक विचार देतात,ती गाथा मंबाजी बाबानी इंद्रायणीत बुडवली तेंव्हा ती गाथा पाण्यावर तरंगू लागली,पण आज घडीला पावलो पावली मला बुडवणार्या मंबाजीची संख्या लाखोंनी आहे.इंग्रजी भाषेवर,इंग्रजी शाळेवर प्रेम करणारे,इंग्रजी शाळा काढून मायबोली मराठी भाषेवर फक्त समाजात खोटे प्रेम दाखवतात.आम्ही मराठी भाषेचे तारणहार आहोत असा आव आणतात.हे माझ्यासाठी घातक आहे.आता होणार म्हणे आभ्यासक्रमात बदल,सर्व शैक्षणिक माध्यमे मातृभाषेतून म्हणजे माझ्या माध्यमातून होणार?होईल नाहीतर नाही….पण हे ऐकुन माझ्या कर्णराजाला आनंद झाला आहे.आपले दिवस आता येणारच आहेत.असा ठाम विश्वास वाटतो आहे.
मंत्री असो का अधिकारी?दीन असो का गर्भश्रीमंत? भ्रष्टाचारी असो का शिष्टाचारी?शिक्षक असो का अधिव्याख्याता?वैद्य असो का अभियंता?व्यापारी असो का वकिल,सैनिक असो का पोलिस?उद्द्योगपती असो का करोडपती?शेतकरी असो का धंदेवाईक?अशा सर्व महाराष्ट्रातील सर्वांची भक्ती फक्त इंग्रजी माध्यमातल्या शाळेवर…..त्या पाल्यांच्या भारोबार पैसे मोजावे लागले तरी फक्त इंग्रजीत शिक्षण माझ्या पाल्याला मिळाले पाहिजे हा अट्टाहास प्रत्येक जण करतो आहे.

माझ्यावर प्रेम करणार्यां शाळेच्या इमारती अगदी सर्वसाधारण पण इंग्रजी शाळेच्या शाळेच्या इमारती अधुनिक हे कटुसत्य माझ्या महाराष्ट्रात दिसते आहे.मला शिकविणार्या शाळेतील शिक्षक तज्ञ व शिक्षकांना पगार भरपुर पण……विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेच्या इंग्रजी शाळेत शिकविणारे जेमतेम बारावी पास पगार हा तुटपुंजा तरीही त्या शाळेत संख्या भरमसाठ व विद्यार्थी भरमसाठ ही परिस्थिती पाहून नवल वाटते आहे.


छ.शिवबा राजांनी तर माझ्या मराठी मुलखाचा बोलबाला संपुर्ण विश्वात करुन, स्वराज्याचे सुराज्य निर्माण केले.
महानुभाव पंथाचा प्रचारक पु.चक्रधर स्वामी महाराजांनी तर मला सातासमुद्रापार नेवून जणु माझा प्रचारच केला.माझा अटकेपार झेंडा फडकवला.भारतरत्न गाणकोळीळा लता मंगेशकर दीदीने तर माझ्या भाषेवरील अनेक अजरामर गीते गाऊंन माराठी भाषेला शिश्वस्तरावर सन्मान मिळवून दिला.वि वा.शिरवडकर यांनी मराठी भाषेला म्हणजे मला वापरुन दर्जेदार साहित्य निर्माण केले.त्यांची जयंती माझा दिन म्हणुन साजरा करतात.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माझ्या भाषेतून शिक्षण घेवून भारतीय धर्मग्रंथ संविधान ग्रंथराजाची निर्मिती करुन इतिहास घडविला.अशा मातब्बर मंडळींनी
फक्त दिड दिवस शाळा करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहेबांनी तर माझ्यामुळेच दर्जेदार मराठी ग्रंथ संपदा निर्माण केली.मला शाहीरीत वापरुन समाजप्रबोधन करुन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली.छ.शिवप्रभुंचा वीररसाचा पोवाडा त्यांनी रशियात सादर केला.म.जोतिराव फुले यांनी संस्कृतिक राजधानी पुण्यात धर्ममार्त॔ण्डाचा विरोध पत्करून आपल्या पत्नीला शिकवून सामाजिक क्रांती केली.सावित्रीबाई फुले यांनी स्वतःचा अपमान सहन करत नारीशक्तीस मराठीत शिक्षण दिले.महिलांना उंबरठ्यात असणार्यां माय-माऊलींना चुल अन् मुल या संकल्पनेतून कायमची सुटका केली. वारकरी संप्रदायातील संत एकनाथ महाराज यांनी रामेश्वर ज्योतिर्लिंग येथुन कावडीतून पुजेसाठी आणलेले पाणी इंद्रायणीच्या वाळवंटात उन्हात लाही-लाहि होणाऱ्या वैषाखीनंदनास पाणी पाजुन तहान भागवून भुत दयाचे आदर्श उदाहरण देऊन माझ्या भाषेतून समाज प्रबोधनात्मक भारुड उत्कृष्ट कला प्रकाराने माझी मान उंचाधण्याचे कार्य केले एवढेच काय तर शाहीर दादा कोंडके या सिने कलावंताने माझा वापर करुन व्दिअर्थी संवाद साधत सलग ९ ते १० चित्रपट सुवर्ण महोत्सवी करुन माझा झेंडा महाराष्ट्रातील जनतेच्या ह्रदयसिंहासनावर आरुढ करुन नवलाई केली.

माजी खासदार व आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माझे उर्जास्त्रोत डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांची माझ्या सहभागातून साप्ताहिक जयक्रांतितील विद्रोही लेखन व ग्रंथ संपदा निर्माण झाली.त्यांचा विचार हा लेखनीतून प्रत्यक्ष कागदावर लेखन करुन मन्याड खोर्‍यातील जनता-जनार्धनास निडर केले. या सर्व दिग्गज महाराष्ट्रातील सुपुत्रांना मानाचा मुजरा करुन सर्व महाराष्ट्रातील जनतेस सदिच्छा देवून थांबतो.हं!


शल्यकार-गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा
९८६०८०९९३१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *