राऊतखेडा तालुका कंधार येथिल अनाधिकृत पुतळा बांधकामावरुन दोन गटात झालेला ताणतणावाचे निवारण – तहसिलदार व्यंकटेश मुंडे

कंधार ; प्रतिनिधी

राऊतखेडा तालुका कंधार येथिल अनाधिकृत पुतळा बांधकामावरुन
मागील काही दिवसांपासून अनधिकृत व विनापरवानगी पुतळा बांधकाम अनुषंगाने निर्माण झालेल्या दोन गटातील ताण-तणाव व कायदा सुव्यवस्था अनुषंगाने तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या पुढाकारातून आज दि.9 मार्च रोजी भेट देण्यात आली शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली.

यावेळी गट विकास अधिकारी के. व्ही बळंवत — ,उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम भरणे कंधार तसेच सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे उस्मान नगर, नायब तहसीलदार विजय चव्हाण महसूल तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह भेट देऊन गावातील दोन्ही गटात आवश्यक त्या सूचना देऊन गावात शांतता प्रस्थापित ठेवण्याची प्रशासनाकडून आव्हान करण्यात आले .

या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
महितस्तव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *