कुरुळा ; विठ्ठल चिवडे
कुरुळ्यापासून जवळच आसलेल्या मरशिवणी येथे जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यलयात महिला दिन साजरा करण्यात आला त्याचवेळी महिला ग्रामसभाही घेण्यात आली.
मरशिवणी ग्रामपंचायतीत महिलांची सदस्य संख्या जास्त असून सरपंच उपसरपंच पदी महिलाच आहेत त्यामुळे ग्रामपंचायतीत महिला राज आहे.आशा या ग्रामपंचायतीत महिलादिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपसरपंच सौ. कौशल्याबाई नारायण लूंगारे या होत्या. तर प्रमुख उपस्थिती ग्रा.पं.सदस्य तथा पत्रकार वैजनाथ गिरी ,रामचंद्र होनराव , गुनाजी लुंगारे यांची होती. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित महिलांना एकमेकींना महिलादिनाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी महिलांची ग्रामसभा घेण्यात आली स्वयंसहायता समुहाच्या माध्यमातून ग्रामसंघ स्थापण करण्यात आले. महिलांच्या समस्येवर ग्रामसभेत काहि महत्वाचे ठराव पारीत करण्यात आले. यावेळी सिनिअर वर्धिनी नंदा अलवने, रेखा बडगे, सविता बोरकर , मंगलबाई भुरे, वर्षाबाई लुंगारे, अनुराधा होनराव, सपना भुरे, स्वाती लुंगारे, मुक्ताबाई ढवळे, अंतेश्वरा जोगपेठे, सारजाबाई वाघमारे, मेघा वाघमारे, फरजाना सय्यद आदि महिलांची उपस्थिती होती.