संकटात सुध्दा महिलांनी न डगमगता कार्य करावे :श्रीमती प्रविणा मांदळे

नांदेड :- कच्छवेज् गुरुकुल स्कुल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका श्रीमती दुर्गादेवी कच्छवे- सोरेकर ह्या होत्या तर यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रवीणा मांदळे , पागरीच्या सरपंच शिल्पा कत्तेवार मेकाले उपस्थित होत्या .

श्रीमती प्रविणा मांदळे यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाची ओळख निर्माण केली आहे कोणत्याही संकटाला न घाबरता आपले कार्य असेच सुरु ठेवावे व समाजात एक उच्च स्थान निर्माण करावे .कोणतेही क्षेत्र असो पुरुषाच्या खाद्याला खांधा लावुन काम करावे.


शाळेतील विधार्थीनी कु नेहा लुटे पाटिल , अंजली गोरे ,दिव्या धुमाळ ,आदिती मुरकुटे व ईशा काळे यांनी रुबेंक्युब चे प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना करुन दाखवले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका सौ. मिरा बाचेवाड ,सौ . भाग्यश्री तेहरा , सौ.शिला अंनतवार व सौ. उषा किनकर यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *