हरिहर चिवडे यांची शिक्षक महासंघाच्या राज्य सदस्यपदी निवड झाल्याबद्दल कंधार येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

येथिल श्री.शिवाजी विद्यामंदिर प्राथमिक शाळा कंधार चे मुख्याध्यापक हरीहर चिवडे यांची महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ प्रांत सदस्यपदी निवड झाली आहे.त्या बद्दल आज दि.11 मार्च रोजी कंधार येथिल शिवाजी नगर येथे सत्कार करण्यात आला.

डॉ.भगवानराव जाधव,प्रा.डॉ.प्रकाश डोम्पले व प्रा.ॲड.गोपाळ पांचाळ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर बेग,डी.जी. वाघमारे, सुंदर अक्षर कार्यशाळा शिवाजीनगर कंधारचे संचालक दत्तात्रय एमेकर, डॉ,पतंजली योग समिती कंधार प्रभारी निळकंठ मोरे यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *