कंधार (प्रतिनिधी)
तालुक्यातील संगमवाडी येथे काल गुरुवारी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पाच लक्ष रुपये कामाच्या सि .सि रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले, यावेळी कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, पंचायत समितीचे माजी सभापती भीमराव जायभाये, पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये लोहा, कंधार मतदार संघातील ग्रामपंचायती जास्तीच्या संख्येने बिनविरोध काढून गावा गावात शांतता व बंधू भाव कायम राखण्याचे आवाहन करून बिनविरोध ग्रामपंचायतींना पाच लक्ष रुपयाचा निधी आमदार स्थानिक विकास निधीतून देण्याची घोषणा लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी केली होती व केलेल्या आश्वासनाची पूर्तता ही आमदार शिंदे यांनी लोहा कंधार मतदार संघातील बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतीला नुकताच पाच लक्ष रुपयांचा निधी देऊन केली आहे ,या निधीतून संगमवाडी येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ . आशाताई शिंदे यांच्या हस्ते काल गुरुवारी पाच लक्ष रुपये कामाच्या सी. सी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले ,
यावेळी अंबुलगाचे सरपंच पांडुरंग मुसळे, बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष सुंदर सिंग जाधव ,मुंडे वाडीचे सरपंच ज्ञानोबा मुंडे, उमरजचे सरपंच परसराम तोरणे, शेकापुर चे सरपंच संदीप भोसकरे,प्रसाद जाधव, परमेश्वर गीते,वसंत मंगनाळे ,ग्रामसेवक रुणजे, सह कार्यकर्ते उपस्थित होते.