शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांची संकल्पना
उस्माननगर ; प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर यांची संकल्पनेतून बीट-उस्माननगर अंतर्गत येणार्या केंद्र शिराढोण, केंद्र चिखली,व केंद्र उस्माननगर या केंद्रातील एकुण 21 महिला शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन कार्यगौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.लक्ष्मीबाई घोरबांड सभापती पं.स.कंधार ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गयाबाई घोरबांड सरपंच,उस्माननगर मा. वसंत मेटकर(शि.वि.अ.),(के.प्र.)
मा.जयवंत काळे , (के.प्र.)मा.ढोणे व्हि.के., (के.प्र.)मा.कनशेटे सर, (के.प्र.)देवणे सर (मु.अ.) यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ व ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर जयवंत काळे यांनी प्रास्ताविक केले .
उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी श्री.वसंत मेटकर यांच्या संकल्पनेतून महिला दिना निमित्त बीटमधील शिक्षिकांचा सत्कार व सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
कोविड काळातही कसलीही तमा न बाळगता विद्यार्थ्यांचा अभ्यास आँनलाईन,आॅफ लाईन,पद्धतीने शिकवत स्वाध्याय पी डी एफ,माध्यमातून चालू ठेवत बीट मध्ये शैक्षणिक वातावरणात सातत्य ठिकवून ठेवले त्याबद्दल सर्व महिला शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सर्व महिला शिक्षिकांची सामान्यज्ञान परीक्षा घेऊन त्यात सौ.लव्हेकर मॕडम(प्रथम),सौ.नरंगले मॕडम (द्वितीय)व सौ.मठपती मॕडम(तृतीय) आलेल्या महिलांचा पुस्तकं देऊन सन्मान करण्यात आला,कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.विश्वकर्मा सर यांनी केले तर सर्वांचे आभार श्री.शिरसाळकर यांनी केले.