अर्धापुर ;प्रतिनिधी
महामार्ग पोलीस ,अर्धापुर फाटा यांचे अपघातात रुग्णांना रुग्णालयात रुग्णवाहिकाद्वारे दाखल करण्याचे कार्य सेवाभावाने, तातडीने व प्रामाणिकपणे करतात ते 108 पेक्षा ही चांगली सेवा देतात.
अर्धापुर महामार्ग कार्यक्षेत्रात सर्वात जास्त अपघात ,जखमी व मृत्यूचे प्रमाण असून त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे.
महामार्ग सुरक्षा पथकाकडील खूप जुनी, कल्याणकर एकमेव असलेली रुग्णवाहिका खूप जुनी व वाईट अवस्था झालेली होती.
करोना काळात लोकनेते खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी महामार्ग चौकी ,अर्धापुरला भेट दिली व सर्व स्टाफ सोबत आस्थेवाईकपणे सुविधा व अडचणीबाबत चर्चा केली त्यावेळी मा.चिखलीकर साहेबाना रुग्णवाहिकेची अडचण लक्षात आली.
लोकनेते खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रुग्णांना अत्याधुनिक सुविधेसह नांदेड येथील बैठकीत एक नव्हे तर 2 रुग्णवाहिका देण्याचे जाहीर केले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार..
नेता असावा तर असा ..
संवेदनशील, अडचण समजून घेणारा आपल्या परीने मदत करणारा..
आज पर्यत एकाही खासदाराने महामार्ग सुरक्षा चौकीला भेट देऊन मदत केल्याची ऐकले नाही..
या 2 रुग्णवाहिकेमुळे निश्चितपणे अपघाती रुग्णांना तात्काळ उपचारासाठी जलदगतीने रुग्णालयात नेता येईल व कित्येक कुटुंबातील जीवलगांचे प्राण वाचतील व वेळीच उपचार मिळतील..