नांदेड जि.प.मध्ये आता बांधकाम विभागाचे तीन कार्यकारी अभियंता कार्यालये


नांदेड, दि.10 – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर नांदेड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची पुनर्रचना करण्यात आली असून या विभागाचे तीन ठिकाणी मुख्यालये निर्माण करून कामात सुसुत्रता आणण्याचा राज्यातील पहिला प्रयोग नांदेड जिल्ह्यात ” अशोकराव चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या कामाच्या या धडाक्यामुळे जिल्ह्याला विकासाची नवी चालना मिळणार आहे.
kkmo

” ”


नांदेड जिल्हा परिषदेमध्ये दक्षिण व उत्तर असे बांधकाम विभागाची दोन कार्यालये होती. त्यासमवेत पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय कार्यान्वीत होते. जिल्ह्यात बांधकाम विभागासाठी तीन कार्यालये असताना सुद्धा या कार्यालयाच्या् कामकाजामध्ये सुसुत्रतेचा अभाव होता .तसेच हे या तीनही कार्यालयाचे नांदेड हेच मुख्यालय होते. या सर्व बाबीचा विचार करून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे तीन गटात विभाजन केले. नांदेड, भोकर व देगलूर अशी जिल्ह्याची विभागणी करून तीन स्वतंत्र कार्यकारी अभियंता कार्यालयाची निर्मिती केली. यासमवेतच नायगाव, मुदखेड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन उपविभागीय कार्यालयास मान्यता मिळवून घेतली.
पंतप्रधान ग्राम सडक योजनाची मोठी व्याप्ती जिल्ह्यात आहे. तसेच नांदेड दक्षिण व उत्तर अशी दोन्ही कार्यालये नांदेड येथेच होती. आता कार्यालयाचे जिल्ह्यात तीन ठिकाणी विकेंद्रीकरण केल्यामुळे कामास गती मिळणार आहे. राज्य व केंद्र शासनाकडून कार्यान्वीत करावयाच्या योजनांची जिल्हाभर प्रभावी अंमलबजावणी आता होणार आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्यात हा प्रयोग नांदेड जिल्ह्यात प्रथमच केला आहे. या नवीन कार्यालयाच्या निर्मितीमुळे मात्र कोणतेही वेगळे मनुष्यबळ लागणार नाही.यामुळे फक्त कामाचे सुलभीकरण होऊन विकास कामाला गती मिळणार आहे.त्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *