कंधार ;ता.प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष राजकुमार केकाटे यांची नुकतीच कंधार कृषि उत्पन्न बाजार समिती च्या संचालक पदी शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या शिफारशीने राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवड केली.
केकाटे गेली तीन ते साडे तीन दशका पासुन राजकीय,सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असुन गोर गरीब सामान्य जनतेसाठी तळमळीने काम करतात अशी त्याची शहरा सह तालुक्यात ओळख आहे. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी शिफारस करुन एका चळवळीच्या कार्यक्रत्यांला सहकार क्षेत्रात काम करण्याची संधी देऊन राजकुमार केकाटे यांना बढती दिली.
ते कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकरी,व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया निवडी बद्दल राजकुमार केकाटे यांनी दिली.
या निवडीबद्दल जेष्ठ नेते दत्ताजी पवार,डाँ सुनिल धोंडगे,दिलीप दादा धोंडगे,मनोहर पाटील भोसीकर,अँड.विजय धोंडगे,शिवराज धोंडगे,शिवदास पाटील धर्मापुरीकर,संभाजी पाटील वडजे,बाबुराव केंद्रे,संजय पाटील कर्हाळे,मारोती मामा गायकवाड,दत्ता कारामुंगे,शिवराज पाटील पवार,सत्यनारायण मानसपुरे,उत्तम चव्हाण,विनोद पापीनवार,न्यानोबा घुगे,माधव मोरे,महेन्द कांबळे,बळीराम पवार ,शाहाजी पाटील शिंदे,नितीन कोकाटे,संतोष कागणे,गोपीनाथ केंद्रे,हफिजभाई घडीवाला,अँड दिगंबर गायकवाड,दिगंबर वाघमारे ,महमद अन्सारोदिन ,एस.पी. केंद्रे ,शरद भागानगरे,सुधाकर कांबळे,अरविंद करेवाडी,सतिश देवकते,मारोती मामा गायकवाड,मुन्ना बस्वंते,सचिन बस्वंते,के डी गायकवाड,दत्ता पवार,शरद पवार,निरंजन वाघमारे,यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.