काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष आशाताई गायकवाड पाटील यांच्या हस्ते कर्तबगार महिलांचा कंधार येथे सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

महिला दिनाचे औचित्य साधुन काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष आशाताई गायकवाड पाटील यांच्या हस्ते कर्तबगार महिलांचा कंधार येथे 8 मार्च रोजी सत्कार संपन्न झाला.

कोरोना काळामध्ये उत्कृष्ट काम करणारी आरोग्यसेविका सविता बोधगिरे, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षिका शेख मॅडम, नांदेड जिल्ह्यामध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पटकावणाऱ्या सौ.रुपाली पदमवार, उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल पूजा आमलापुरे,तसेच शेतकरी महिलांचा पण सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये प्रियंका शेंडगे, पंचफुला लुंगारे ,कृतिका शेंडगे,इंदू गोरे, शिवानी लुंगारे ,अंजली नळगे, अनिता कौटकर, कोमल पुलकुंडवार, पुनम शिंदे इत्यादी महिलां कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *