हृदयाच्या वॉल चा गेल्या दोन दशका पासून प्रॉब्लेम आहे .औरंगाबाद येथे कार्यरत असलेलेब अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ देवदूत डॉ एस एम गायकवाड साहेब हे लोह्याला असताना त्यांनीच याबाबत अवगत केले .. २००३ मध्ये त्यांचे मित्र डॉ शिरीष देशमुख यांच्याकडे हृदयाच्या एका वॉल चा आकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मोठा केला.
त्यानंतर मागील दोन वर्षांपूर्वी मे महिन्यात थोडा प्रॉब्लेम झाला होता .पण लोह्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ देवदूत। डॉ राहुल घंटे साहेब ,भूमिपुत्र प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ देवदूत डॉ मिलिंद धनसडे साहेब यांच्या सल्ल्याने व उपचाराने तो प्रॉब्लेम थोडा दूर झाला .बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथे दाखविल्या नंतर मोठी शस्त्रक्रिया सध्यातरी टाळली. डॉ घंटे साहेब , व डॉ धनसडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी रुटिंग तपासणी, औषध गोळ्या सुरू असतात ..या काळात लोह्याचे देवदूत डॉ कानवटे साहेब यांची मोठी मदत झाली
कोरोना लस घेताना वार्फ गोळी जी की मी दररोज घेतो तो चार दिवस स्टॉप करावी लागली व रक्त पातळ (INR ) चे प्रमाण दीड पर्यन्त आणले व त्यानंतरच डॉ गायकवाड साहेब, डॉ धनसडे साहेब, डॉ घंटे साहेब व त्यांचे मित्र डॉ उदगीरे यांच्या समुपदेश नंतर आज लोह्यात (१३ मार्च) ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेतली.
डॉ लोहारे साहेब, डॉ सरकार मॅडम, त्यांचे सर्व स्टॉप, धनंजय संगवे, रत्नाकर, बालाजी ढवळे, व आमचा प्रवीण , बालाजी धनसडे, यांची सोबत होती. डॉ चव्हाण, डॉ जवळगेकर हे योगायोगाने लस घेण्यासाठी आले होते त्यांनी समुपदेशन केले..भीती नव्हती पण गोळी सुरू होती त्यामुळे एकाच आठवड्यात दोनदा INR टेस्ट केले, पेशी पहिल्या व त्यानंतर लस घेतली जेणेकरून आपण ‘सेफ ” राहू
सर्वांचे जाहीर आभार….
आपला
हरीहर धुतमल ,लोहा
जि.नांदेड