कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन कोटी साडेचौदा लक्ष अनुदान मंजूर ;आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पाठपुराव्यला यश

कंधार ;प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील ६एप्रिल २०२०या महिन्यामध्ये गारासह
चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता या अवकाळी पावसामुळे कंधार मतदार संघातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले रब्बी पिक,फळ भाजी पाला चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,

कंधार ,लोहा मतदारसंघातील वादळी वा-यामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस होऊन शेतकऱ्यांचे मोठी नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी कंधार, लोहा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रशासनाला सोबत घेवुन नुकसानीची पहाणी केली व शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून गेल्या अधिवेशनात शेतकऱयांना मदत मिळवून देण्यात आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले

असून कंधार तालुक्यातील काटकळंबा, राहाटी, तेलुर, औराळा, चिचाली, चौकीधर्मापुरी, बोळका, शेकापुर, संगमवाडी, तळ्याचीवाडी, पानशेवडी, फुलवळ, कंधारेवाडी, मुंढेवाडी, नांवद्याचीवाडी, वाखरड, मंगलसांगी, नंदनवन, बिजेवाडी, या गावतील शेतक-यांची अवकाळी पावसाने नुकसान झाली त्या शेतकऱ्यांना दोन कोटी १४ लक्ष ५०हजार ६०० रुपय कंधार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांन प्राप्त झाले असून हे अनुदान पुढील महिन्यात इतर होणार आहे ,

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत मिळवून देण्यासाठी लोहा,कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी यावेळी प्रशासन दरबारी प्रयत्न केले होते माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचेही आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बोलताना सांगितले, दरम्यान शेतकऱयांना मोठया संकटात आर्थिक मदत लवकरच मिळणार असल्याने कंधार लोहा मतदार संघातील शेतकऱ्यातून आमदार शिंदे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *