कंधार ;प्रतिनिधी
अल्पअवधित लोकप्रिय ठरलेल्या मामा मित्र मंडळाची कंधार लोहा तालुक्यासह नांदेड जिल्हात ठिकठिकाणी संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात येत आहेत .त्याचाच भाग म्हणून कंधार तालुक्यातील बारुळ येथे आज दि.15 मार्च रोजी बैठक घेण्यात येवून गाव तेथे मामा मित्र मंडळाची शाखा स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला.
गावगावात दीन दलीत व गोर गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मामा मित्रमंडळ कार्यरत असते.कंधार तालुक्यातील बारुळ येथे आयोजित बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी मामा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मारोती मामा गायकवाड ,बाबुराव टोम्पे,प्रताप कांबळे ,राजु गायकवाड ,मालोजी दुधकावडे,वळसंगवाडीकर,कैलास दुधकावडे,बालाजी गाडेकर,अजित कादेकर,काळबा बारुळकर आदीसह कार्यक्रते यावेळी उपस्थित होते.