कंधार ; प्रतिनिधी
मजरे धर्मापुरी तांडा तालुका कंधार येथील भूमिपुत्र असलेले दिव्यांग शिक्षक श्री बळीराम जाधव सर यांनी त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण क्षेत्रांमध्ये त्यांनी उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे…. लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकी असणारे दिव्यांग शिक्षक हे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यामध्ये अनाथ आश्रमाला वस्तू रुपात भेट देणे अनाथ मुलांच्या वसतिगृहाला भेट देणे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे असे उपक्रम राबवतात. यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्याच तांड्यावरील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी तांड्यावरील मुलं चांगल्या प्रकारचे शिक्षण घ्यावेत यासाठी त्यांनी शालेय साहित्याचे वाटप करून तांड्यामध्ये एक आदर्श अशी परंपरा निर्माण केली आहे.
तसेच सध्या कोरणा च्या महामारी मुळे सर्वत्र शाळा बंद असल्यामुळे त्यांनी स्वतःचं एक शैक्षणिक ॲप निर्माण करून महाराष्ट्रातील सर्व पहिली ते पाचवीचे विद्यार्थी ॲपचा फायदा घेत आहेत.. त्याच बरोबर त्यांनी शैक्षणिक पीडीएफ साहित्य निर्मिती करून तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून पुढे आले आहेत… तसेच त्यांना यावर्षीचा अहमदनगर जिल्हा लोकसत्ता संघर्ष आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.
तसेच बळीराम जाधव सर हे किनवट तालुक्यातील निराळा तांडा येथील बंजारा समाजाचे शाहीर श्री. दौलत राठोड हे दिव्यांग असल्यामुळे दर महिन्याला आर्थिक मदत पण करतात ,यावरून सरांच्या मनाचा मोठेपणा आणि सामाजिक बांधिलकी लक्षात येते.