नांदेड जिल्ह्यात आज 566 व्यक्ती कोरोना बाधित ; दोघांचा मृत्यू जनतेने सुरक्षितता पाळण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 669 अहवालापैकी 566 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 255 तर अँटिजेन तपासणीद्वारे 311 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 26 हजार 957 एवढी झाली आहे. शनिवार 13 मार्च 2021 रोजी सिडको नांदेड येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर वजिराबाद नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 616 एवढी झाली आहे.

आजच्या 2 हजार 669 अहवालापैकी 2 हजार 21 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 26 हजार 957 एवढी झाली असून यातील 23 हजार 741 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 2 हजार 380 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 52 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 130, किनवट कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 1, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 44, हदगाव कोविड रुग्णालय 4, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 15 असे एकूण 207 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 88.06 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 189, अर्धापूर तालुक्यात 3, बिलोली 1, हिमायतनगर 12, किनवट 3, मुदखेड 5, नायगाव 5, निजामाबाद 1, परभणी 1, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 15, भोकर 1, हदगाव 1, कंधार 1, लोहा 6, मुखेड 5, उमरी 1, हैदराबाद 1, हिंगोली 2 असे एकूण 255 बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 225, अर्धापूर तालुक्यात 4, देगलूर 8, हदगाव 4, किनवट 8, लोहा 10, मुदखेड 1, उमरी 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 15, बिलोली 2, धर्माबाद 8, भोकर 3, हिमायतनगर 3, माहूर 9, मुखेड 1, परभणी 5, यवतमाळ 2 असे एकूण 311 बाधित आढळले.

जिल्ह्यात 2 हजार 380 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 93, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 79, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 38, किनवट कोविड रुग्णालयात 40, मुखेड कोविड रुग्णालय 40, हदगाव कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 13, महसूल कोविड केअर सेंटर 140, देगलूर कोविड रुग्णालय 9, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 374, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 361, खाजगी रुग्णालय 189 आहेत.

रविवार 14 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 98, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 35 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 50 हजार 27
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 18 हजार 357
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 26 हजार 957
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 23 हजार 741
एकुण मृत्यू संख्या-616
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 88.06 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-24
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-35
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-312
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 380
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-52.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *