कंधार ;
दि 14 मार्च (प्रतिनधि)
फुलवळ ता. कंधार येथील ग्राम पंचायत निवडणूक झाल्यानंतर नवनिर्वाचित सरपंच , उपसरपंच , ग्राम पंचायत सदस्यांची व ग्रामस्थांची सदिच्छा भेट घ्यावी या हेतूने काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर , सामाजीक कार्यकर्त्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर व बहद्दरपुरा ग्राम पंचायत चे उपसरपंच हणमंत पाटील पेठकर यांनी निवडणूक काळानंतर पहिल्यांदाच फुलवळ येथे भेट दिली , यावेळी सरपंच सौ.विमलबाई मंगनाळे , ग्रा.पं. सदस्य प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , नागनाथ मंगनाळे , बसवेश्वर मंगनाळे रामजी जेलेवाड , कामाजी मंगनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुलवळ येथे भेट दिली असता ग्राम पंचायत च्या वतीने भोसीकर दाम्पत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार करता फुलवळ वासीयांकडून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भोसीकर परिवाराने फुलवळ जि. प. गटातुन निवडणूक लढवण्यासाठी पहिले प्राधान्य द्यावे असा आग्रह ही धरला , जेणेकरून मागच्या कार्यकाळात सौ.वर्षाताई भोसीकर यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमुळे विकास तर झालाच परंतु विविध उपक्रमांनी गाजलेल्या फुलवळ गटाला संबंध महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली त्यामुळे शिल्लक राहिलेली उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी फुलवळ गटात पुन्हा एकदा भोसीकर परिवाराचा सदस्य जि. प. सदस्य म्हणून यावा अशी उपस्थिती ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
सत्काराला उत्तर देताना सौ. वर्षाताई भोसीकर या म्हणाल्या की आपलं रक्ताचं आणि जिव्हाळ्याचं नात आहे आणि ते वृद्धिंगत राहावे यासाठी आम्हा भोसीकर परिवाराचे सदैव प्रयत्न राहणार आहेत , तसेच आपल्या सर्वांची इच्छा असेलच आणि योगायोगाने जर इथले तसे आरक्षण सुटलेच तर नक्कीच भोसीकर परिवारातील सदस्य हा आपल्या सेवेकरिता उपलब्ध होईल आणि मागच्या काळात उर्वरित राहिलेली कामे मार्गी लावून ती पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील यात तिळमात्र शंका करण्याचे कारण नाही असा विश्वास त्यांनी फुलवळकरांना त्यांनी दिला.
यावेळी संजय भोसीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले , सूत्रसंचलन विश्वांभर बसवंते यांनी केले तर आभार प्रवीण मंगनाळे व्यक्त केले.
यावेळी परमेश्वर मंगनाळे , गंगाधर शेळगावे , महेश मंगनाळे , दीपक फुलवळे , मधुकर डांगे , परमेश्वर डांगे , दिगंबर डांगे , कैलास मंगनाळे , गणपत फुलवळे बाळू जेलेवाड सह अनेकांची उपस्थिती होती.