कै. दगडोबा देवकत्ते यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना नीमित्त वृक्षारोपण व व्याख्यान मालेचे आयोजन

कंधार ;प्रतिनिधी
तालुक्यातील सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीला मोठे योगदान देणारे विद्यार्थी प्रिय उपक्रमशील शिक्षक कै. दगडोबा खंडोजी देवकत्ते यांच्या प्रथम पुण्यस्मर दिना निमित्त भोजुचीवाडी येथे दि. 20 मार्च 2021 रोजी दुपारी 12 वाजता वृक्षारोपण व व्याख्यान माला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


कै. दगडोबा खंडोजी देवकत्ते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड दक्षिण मतदार संघाचे विद्यमान आमदार मोहनअण्णा हंबर्डे है राहणार असुन कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणुन माजी सनदी आधिकारी एकनाथ उर्फ अनिल मोरे याचे मातृत्व-पितृत्व आणि कुटूंबातील ओलावा या विषयावर व्याख्यान होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी हणमंतराव पा. बेटमोगरेकर, सौ. आशाताई शिंदे , शिवाभाऊ नंरगले, डाँ. श्याम तेंलग, संजय भोसीकर (माजी जि.प.सदस्य), एकनाथ पवार, शाहजी नळगे (नगरसेवक), सुधाकर कांबळे (नगरसेवक), उत्तम चव्हाण ( पं.स.सदस्य), बालाजी पांडागळे, बाबु गिरे, बाळु क-हाळे इत्यादीची उपस्थिती राहणार आहे.


तरी या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन सतिश दगडोबा देवकत्ते (सरपंच ग्रा. प. भोजुचीवाडी ता. कंधार जि. नांदेड ) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *