लोहा (प्रतिनिधी)
गेल्या एक वर्षापासून जागतिक पातळीवर कोरोना या महामारी ने कहर केला असून महाराष्ट्रासह देशभरात हजारो जणांचे प्राण कोरोना विषाणूने घेतले असून कोरोनाला हरवण्यासाठी लोहा, कंधार मतदार संघातील सर्व जनतेनी शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब करून कोरोना वर मात करण्याचे नम्र आवाहन लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले आहे .
शासनाच्या आरोग्य विभागाने घालून दिलेल्या त्रिसूत्री चे लोहा ,कंधार मतदार संघातील जनतेनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी केले असून लोहा ,कंधार तालुक्यातील सर्व जनतेनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाचाही योग्य अंमल करून मतदारसंघातील सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर,वेळोवेळी तोंडाला मास्क लावणे व वेळोवेळी सॅनेटाईझर चा वापर काटेकोरपणे करून कोरोना विषानुवर मात करावी व मतदारसंघातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडून आपली व कुटुंबाची आपण स्वतः काळजी घेण्याचे आवाहनही आमदार शामसुंदर शिंदे यांनी केले आहे.
नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत असून वेळोवेळी पूर्णता लॉककडाऊन सर्वसामान्यांना परवडणारे नसल्यामुळे लोहा, कंधार मतदार संघातील नागरिकांनी लॉकडाउन टाळण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे व माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सर्व नागरिकांनी तन-मन-धनाने पाळून आपली व आपल्या कुटुंबाचा कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करावा व शासनाचे सर्व नियम पाळून कोरोनाला हरवावे असे नम्र आवाहन लोहा, कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी लोहा, कंधार मतदारसंघातील सर्व नागरिकांना केले आहे.