कंधार ;प्रतिनिधी
दोन दिवसा पूर्वी वाळू माफिया कडून पत्रकार संघाचे अध्यक्ष सत्यनारायण मानसपुरे यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या गंभीर प्रकरणाचा कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून कंधार तालुक्यात अवैध रित्या सुरू असलेली वाळू वाहतूक बंद करण्याची मागणी तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मंगळवारी (दि.१६) रोजी सत्यनारायण मानसपुरे आणि पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण हे दोघे चारचाकी वाहनाने लोहा येथून कंधार कडे येत असतांना त्यांच्या गाडीस साईड न देता धुरळा उडवीत जात असलेल्या वाळूच्या गाडीस जाब विचारल्या नंतर मानसपुरे व चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी वाळू माफिया कडून देण्यात आली. या प्रकरणाचा पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करून गत कित्येक वर्षां पासून तालुक्यात बिनधिक पणे सुरू असलेली अवैध वाहतुक बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या कडे करण्यात आली.
निवेदनावर मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर गायकवाड, तालुकाध्यक्ष सत्यनारायण मानसपुरे, सचिव योगेंद्रसिंह ठाकूर, कार्याध्यक्ष दयानंद कदम, हाफिज घडीवाला, महंमद अनसरोद्दीन, एन.डी. जाभाडे, राजेश पावडे, विठ्ठल कत्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.