या चिमण्यांनो परत फिरा रे,घराकडे आपुल्या…

चिमणी दिन विशेष..

 चिमण्यांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या संख्येबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून "नेचर फाॅरेव्हर सोसायटी"या संस्थेने पुढाकार घेऊन२०१०पासून २०मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस"म्हनूण साजरा केला .सध्यास्थिती मध्ये वाढलेले आधुनिकीकरण,गगणचुंबी इमारतींची होणारी प्रचंड वाढ,मोबाईल फोन टाॅवर्स,केमिकल कंपन्यांच्या नळकांड्यामधून बाहेर पडणारा धूर चिमण्यांच्या जीवावर बेततोय, या सर्व गोष्टीमूळे चिमणी हा पक्षी अडचणीत आला आहे.आमच्या लहानपणी आम्हि सर्व बच्चेकंपनी चिमणीच्या चिवचिवाटाने साखरझोपेतून उठत,तिचा तो सुमधूर चिवचिवाट आता मात्र नामोनेष व्हायच्या मार्गावर आहे.खर पाहाता शहरातुन चिमणी तर हद्दपारच झाली आहे.ग्रामीण भागात ही वृक्षतोडी मूळे तीचे दर्शनही दुर्लभ होत आहे.आपल्या महाराष्ट्रात चिमण्यांचे दोन प्रकार आढळून येतात,एक म्हणजे घरचिमणी  आणि दुसरी म्हणजे रानचिमणी(पितकंठी)अख्या जगामध्ये चिमण्यांचे २८प्रकार आढळून येतात.आपल्या भारतात सहा प्रकारच्या जातीच्या चिमण्या आढळतात.त्या वर्षातून चारवेळा अंडी देतात,दिसायला अत्यंत आकर्षक असणारा हा इवलासा जीव पाहाताच क्षणी मन वेधून घेतो.शहरात नदीकाठी अरण्यात,माळरानात,डोंगरावर चिमण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर असायचे.आता मात्र दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटत चालली आहे,ते केवळ मानवाच्या कृत्यामूळे हे विदारक सत्य आहे.अजून काही दिवसांनी मात्र ...एक घास चिऊचा...फक्त पुस्तकातच बघायला मिळेल.ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून पर्यावरण प्रेमींनी चिमणी वाचवा मोहिम सुरु केली आहे.नागरिकांना पक्ष्याबद्दल असलेले अज्ञान दूर करुन त्यांच्या मनात चिमणीविषयी दयाभाव उत्तपन्न करुन तीला जगवायलाच पाहिजे ही भावना पक्षीप्रेमी जनसामान्यात रुजवत आहेत.
     चिमणी हा पक्षी बुलबूलपेक्षा किंचीत लहान असतो. चिमणी भारताप्रमाणेच पाकिस्थान,बांगलादेश,श्रीलंका,आदि देशामध्ये आढळते.हा सर्वभक्षी प्राणी आहे.समाजप्रिय असल्यामूळे मानवी वस्तिच्या आसपास तो वास्तव्यास असतो.नर चिमणीचे डोके राखाडी राखाडी रंगाचे असून गळा व डोळ्याजवळचा भाग हा काळपट असतो.पाठ आणि पंख तांबूस काळसर असते.तर शेपटी ही गर्द तपकीरी रंगाची असते.नर व मादी चिमणीची चोंच ही आखुड,जाड असुन तपकिरि असते.विणीच्या हंगामात मात्र ती काळी होते.चिमणी एका वर्षात अंदाजे तीन ते चार वेळा अंडी घालते.विशेष म्हणजे चिमण्या आपल्या मिलन काळात मातीत आंघोळ करतात.त्यांच्या विणीसाठी हे खुपच म्हत्वाचे आहे.नर व मादी सहजच ओळखायला येतात.गवताच्या बिया,धान्य,अन्नपिकावरच्या आळ्या हे आहे.या पक्ष्यांची वीण वर्षातून किमान तीनवेळा असते.घरटे तयार झाल्यावर मादी त्यात अंडी घालते.अंडी उबवणे आणि पिलांचे संगोपन मादी करते.चिमण्यांचे आयुर्मान सहा महिने ते तीन वर्षापर्यंतचा असतो.तिचे पंख मजबूत नसल्यामूळे तिला उडता येत नाही,त्यामूळेच ती टूणटूण मारते.


       चिमणी नसेल तर आपल्याला काय फरक पडतो हा विचार करत असाल तर,हा मूर्खपणा ठरेल कारण,ज्या चिनमधून कोरोना सर्वत्र पसरला,त्या चीनमधल्या कम्युनिस्ट विचारसरणीच्या हुकूमशाहाने चिमणी हा पक्षी चीनमधून नामोनिशाण करण्याचा प्रयत्न केला कारण,काय तर शेतातील धान्य चिमण्या फस्त करतात असा त्याचा समज झाला होता.म्हणून त्याने "चिमण्या मारा"ह्या मोहिमेची जाहिर घोषणा केली.नागरिकांनी देखिल या मोहिमेत हिरारीने भाग घेतला,चिमणीनष्ट झाल्यावर१९६०मध्ये पीकांवर टोळधाडीचे सत्रसुरु झाले,या टोळांना खाण्यासाठी त्यांचा नैसर्गिक शत्रू शिल्लक नसल्यामूळे साठटक्के शेती उध्वस्थ झाली.निसर्गचक्रात हस्तक्षेप करण्याची कींमत चीननागरीकांना मोजावी लागली अन्नावाचून अडीचकोटी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.चिमण्या फक्त दाणेच खात नाहीत तर त्या पिकांचे कीटकापासून रक्षण देखिल करतात हे समजेपर्यंत खूप उशिर झाला होता.त्यावर उपाय म्हणून सोव्हिएत राष्ट्रसंघाकडून चिमणी आयात केल्या गेल्या आणि चीनचे निसर्गचक्र पुन्हा सुरळीत झाले.हे देखिल विदारक सत्य आहे.

     सध्या उन्हाळ्यास सुरुवात होत आहे.आपणही चिमण्यांसाठी घराच्या गच्चिवर,अंगणात,खिडकीत चिमण्यांसाठी मूठभर दाणे आणि वाटीभर पाणी ठेवण्यास सुरूवात करुया.घराच्या बगिच्यात त्यांचा खोपा असलेले वृक्ष तोडण्याचे टाळा,चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले तर मानवीजीवन देखिल धोक्यात येईल चीनच्या प्रकरणावरुन आपल्याला हे लक्षात येईल.त्यामूळे या पिढीला चिमणीचे महत्व पटवून सांगायला हवे नाहीतर..."चिमणी"हा पक्षी पाहाण्यासाठी आपल्याला गुगलवर सर्च करण्याची दुर्दैवी वेळ येईल यात शंकाच नाही.चिमणी हा पक्षी मानवापूढे हतबल आणि असाह्य आहे.त्यामूळे आपण आपली जबाबदारी ओळखून निसर्गाप्रती कृतज्ञ राहू या.हा निसर्ग देखिल चिऊताईच्या चिवचिवाटाने समृध्द होईल...चला तर मग,चिऊताईसाठी मनाची तरी कवाडे उघडूया...कारण,चिमण्यांचा चिवचिवाट ऐकत दिवस उगवणं यासारखं दूसर सुख नाही,म्हणूनच म्हणावस वाटत....

“या चिमण्यांनो,परत फिरा रे
घराकडे आपल्या….”

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *