कल्पक अक्षर आणि जागतिक चिमणी दिवस

कंधार–20 मार्च 2021


सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार ही कार्यशाळा आपल्या नानाविध कल्पनेने आनेकांना भावते,सुंदर कार्यशाळेचा आत्मा म्हणजे विविध उपक्रमच!आजपर्यंत अनेक सृजनशीलतेतून उपक्रम यशस्वी केले आहेत.आजच्या 20 मार्च या जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्त्याने कल्पक अक्षरातून झाडांची फांदीत जागतिक, चिमणी खोप्यावर तर दिवस चिमणी अक्षर काढुन कलाविष्कारातून चिमणी दिवसाच्या औचित्याने हे चित्र आपल्या अवलोकनार्थ…..
आजच्या कंधारी आग्याबोंड ऐवजी, कल्पक अक्षरातून जागतिक चिमणी दिवस


मोबाईलच्या ध्वनी लहरीने,
आम्हा इटुकल्यांना संपविले!
घरावर दाणापाणी ठेवणार्‍या,
मानवाने आम्हाला कृतज्ञ केले!
पक्षीमित्र खरे आमचे रक्षक,
त्यांनीच आम्हाला अभय दिले!
खोपा विणण्याची कला अंगी,
म्हणून सुगरण संबोधु लागले!


गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

2 thoughts on “कल्पक अक्षर आणि जागतिक चिमणी दिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *