@AshokChavanINC Tweet
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्शिती चिंताजनक होते आहे. या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मी या बैठकीत दिले.
व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ११ दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती.