एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1अंतर्गत मुखेडच्या खंडोबा गल्ली येथे नवीन अंगणवाडी चे उद्घाटन

मुखेड; प्रतिनिधी

एकात्मिक बाल विकास प्रकल्प 1अंतर्गत मुखेडच्या खंडोबा गल्ली येथे नवीन अंगणवाडी चे उद्घाटन दि.२३ मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मुखेड शहर हे 27 हजार लोकसंख्या पेक्षा जास्त असलेले शहर आहे. यात खंडोबा गल्ली हे देखील सुमारे 2 हजार लोकसंख्या असलेले आहे.येथे अल्पसंख्यांक मागासवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात.

यामध्ये हमाली मजुरी भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात आहे.त्याच बरोबर झिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांची संख्या उल्लेखनीय आहे. नवीन अंगणवाडी मुळे या सर्वांना नक्कीच फायदा होईल.

सुमारे चार वर्षापासून सार्वजनिक स्तरातून अंगणवाडी ची मागणी होत होती.माननीय बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश नगर नांदेड, रेखा कळम यांनी मुखेड येथिल खंडोबा गल्ली रहिवाशांच्या प्रयत्नास यश मिळवून दिले.

23 मार्च 2021 रोजी अंगणवाडी चे उद्घाटन माननीय नगरसेवक घोगरे मुखेड नगरपालिका यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित अंगणवाडी सुपरवायझर एस. एम.पेंदे व व्ही.आर गरुड मॅडम तसेच भाजपा कार्यकर्ते विनोद दडलवाड, शादुल होनवडजकर, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते अंकुश मुंडे यांच्यासह गल्लीतील महिला बचत गटाचे महिला मंडळ उपस्थित होते .

यावेळी श्रीमती संगीता गीते ( मुंडे )यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती मिळाली असल्याने खंडोबा गल्ली येथे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *