आशाताई शिंदे यांच्या हस्ते कोविड सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांना पी पी इ किट व सॅनिटायझर चे वाटप
लोहा( प्रतिनिधी)
लोहा येथील कोविड सेंटरला सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कोविड सेंटरच्या सर्व सोयी सुविधांसह रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा दि.24 मार्च रोजी घेतला, यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बारी ,लोहा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे,आय.टी. आय.कॉलेज प्राचार्य पतेवार, खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम आण्णा पवार उपस्थित होते. लोहा covid-19 रुग्णालयातून उपचार घेत असलेल्या रुग्णांनी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्याकडे कोविड सेंटरमधील रुग्णांनि पिण्याच्या पाण्याची टंचाई सोडण्याची रुग्णांनी मागणी केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत काल बुधवारी सायंकाळी सौ. आशाताई शिंदे यांनी लोहा कोविड सेंटरला भेट देऊन प्रत्यक्ष रुग्णांशी संवाद साधून रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेऊन कोविडसेंटर मध्ये तात्काळ आमदार निधीतून एक नवीन बोअर देण्याचे आश्वासन दिले,
कोविड सेंटर जवळील एका बोअर द्वारे रुग्णांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्या बोअर चा पाणीसाठा कमी झाल्यामुळे कोविड रुग्णांचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी रुग्णालयातील रुग्णांनी आशाताई शिंदे यांच्याकडे केल्या होत्या या तक्रारीची गांभीर्याने दखल बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी घेतली, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आशाताई शिंदे यांच्याशी संपर्क साधून लोहा कोविड सेंटर मधील रुग्णांच्या पिण्याच्या पाण्यासह इतर सोयीसुविधा रुग्णांना तात्काळ देण्याची मागणीही आशाताई शिंदे यांनी करून लोहा कोविडसेंटरमध्ये रुग्णांना अध्यायात व दर्जेदार सुविधा देण्याची मागणी यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली,
कोरोनाच्या गंभीर संकटात आपल्या जीवाची पर्वा न करता जवळपास पाऊण तास कोविडसेंटर मधील कोरोना रुग्णांच्या समस्या सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई शिंदे यांनी जाणून घेतल्या व लोहा नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना कोविडरुग्णांना तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करण्यासाठी सूचना दिल्या, यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी कोविड सेंटर मधील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पी. पी. इ किट ,मास्क व सॅनि टायझर चे वाटप केले व सर्व कोविड रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले, स्वतः आशाताई शिंदे काही महिन्या खाली कोरूना पॉझिटिव्ह येऊनही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आशाताई कोरोनाच्या संकटातही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर असल्याने लोहा कोविड सेंटरमधील रुग्णांनी व नातेवाइकांनी आशाताई शिंदे यांचे यावेळी आभार व्यक्त केले यावेळी योगेश पाटील नंदनवनकर, शुभम कदम,अशोक सोनकांबळे, सचिन कल्याणकर उपस्थित होते.