बामणी फाटा येथील व्यापा-यांची कोवीड अन्टीजन टेस्टव्दारे तपासणी

हदगाव प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटांमुळे संपुर्ण जग अडचणीत आले असल्याने आजार कमी करण्यासाठी शासन विविध प्रकारे सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याऐवजी कानाडोळा केला जात असल्याने नांदेड जिल्ह्यात कोरोना आजाराचे दुसऱ्या टप्प्यात दिवसेंदिवस रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. नाईलाजाने २५ मार्च ते पाच एप्रिल पर्यंत लाकडाऊन लावणे भाग पडत आहे. या आजाराची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली कोवीड टेस्ट व लसीकरण मोहीमेचा वेग वाढवला जात आहे.


बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत लहान मोठे तिस गावे असुन निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनाठा चिंचगव्हान सह परीसरातील बरेचसे गावांसाठी बामणी फाटा बाजारपेठ व बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य सोयीचे ठरते.परीसरातील मोठी बाजारपेठ बामणी फाटा असल्याने बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम.मानसपुरे यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचारी व टिमने बामणी फाटा येथील व्यापा-यांच्या दुकानात जाऊन सोमवारी तिस तर मंगळवारी सतरा कोवीड अन्टीजन तपासणी केली.त्यामध्ये चार संशयित रुग्ण आढळले असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून हदगाव कोवीड सेंटर वर पाठवण्यात आले.तर उर्वरित व्यापारी वर्गाची तपासणी व नियमांचे पालन करण्यासाठी विविध प्रकारे सुचना देऊन ही सहकार्य केले जात नसल्याने नाईलाजाने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे डॉ.एस.एम. मानसपुरे यांनी सांगितले.


गेल्या दोन दिवसापासून टप्याटप्याने बामणी फाटा मार्केट मध्ये व्यापारी बांधवांची अंटीजन टेस्टद्ववारे कोविड तपासणी चालु आहे या तपासणी मध्ये चार जनांचा चा अहवाल संस्यीत आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा उपरुग्णालय हदगाव येथे हलविण्यात आल्याने बाजार पेठेत एकच खळबळ उडाली व्यापारी बांधवा मध्ये भितीचे वातावरण पसरल्याने मी तुर्तास ही तपासणी काही वेळासाठी थांबवण्याची डॉ.मानसपुरे यांना विनंती केली राहिलेल्या व्यापारी बांधवांची तपासणी करुन घेण्याचा शब्द मी त्यांना दिला चार पैकी एका व्यापारी बांधवाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

अरुण पाटील उंचाडकर
अध्यक्ष व्यापारी असोसिएशन बामणी फाटा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *