हदगाव ;प्रतिनिधी
हदगांव तालुक्यातील भाटेगाव येथील गंगाराम पाटील विद्यालयच्या पाठीमागील पडीत जमिनीवर सामाजिक वनीकरण हदगांव विभागाने गत तीन वर्षा पासून वृक्ष लागवड केली. आज रोजी किती वृक्ष जिवन्त आहेत हें विशेष.
जिल्हा परिषद शाळा व गंगाराम पाटील माध्यमिक विद्यालय परिसरात सामाजिक वनीकरण हदगांव विभागाकडून वृक्ष लागवडीस एकूण खर्च किती? वृक्ष किती लावले?संगोपणासाठी खत, पाणी, मजूर असा किती निधि खर्च झाला? याची चोकशी करून आज रोजी किती वृक्ष जिवन्त आहेत.अशी तक्रार सुदर्शन शिंदे भाटेगावकर यांनी सामाजिक वनिकरण परीक्षेत्र अधिकारी हदगांव कार्यालयात केली आहे.
सुदर्शन शिंदे यांनि दिलेल्या तक्रारीवर शेकडो ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत. शासनाने वृक्ष लागवडीसाठी करोडो रुपये खर्च करून संगोपणासाठी निधि मंजूर केला.आणि सर्वात जास्त निधि वृक्ष लागवडी वर खर्च होतो.पण संगोपणा अभावी वृक्ष वाळून जातात हें चित्र तालुका भरात काही ठिकाणी अपवाद वागळता सर्वत्र बघा वयास मिळते. मा. साहेबांनी वृक्ष लागवड केलेल्या ठिकाणी तक्रार दारा समक्ष जायमोख्यावर जाऊन सत्यता पडताळून दोषी आढळ्यास कार्यवाही करावी.असे तक्रारदार सुदर्शन शिंदे यांचे म्हणणं आहे. या तक्रारी वर काय कार्यवाही होईल याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.