हदगाव प्रतिनिधी
लॉकडाऊनला हदगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांनी, व्यापारीबांधव उद्योजक, कर्मचारी, कामगार, डेली वेजेस कर्मचारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी केले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या लॉकडाऊनमध्ये त्रिसुत्रीचे पालन करुन कोरोना बधितांची संख्या कमी करायची आहे. यामुळे या आवाहानाला नागरिकांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचेही डापकर म्हणाले.
- हदगाव शहरामध्ये दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. शहरामध्ये वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने संबंध नांदेड जिल्हयात 24 मार्च ते 4 एप्रिल काळात कडकडीत लॉकडाऊन घोषित केला आला आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घराबाहेर न पडता सहकार्य करा, असे आव्हान डापकर यांनी नागरिकांना केले आहे.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव , पोलीस निरीक्षक लक्षमण राख, तालुका आरोग्य अधिकारी दिपक कदम पत्रकार बांधव आदी प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला.
हदगावकरांनो लॉकडाऊनला सहकार्य करा सर्वांनी पुढील लॉकडाऊन टाळण्यासाठी आताच सहकार्य करा. लॉकडाऊन वाढवण्याची वेळ येऊ नये यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे डापकर म्हणाले.हदगाव शहारालगत तालुक्यासह ग्रामीण भागालाही अलर्ट- रहाण्याची विनंती त्यांनी केली लॉकडाऊनमध्ये शहरालगतच्या गावामधील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हदगाव लगतच्या तामसा मनाठा निवघाबाजार शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये संचारबंदी कायम राहणार आहे. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढल्यास भविष्यात अडचणी वाढेल यामुळे सहकार्य करा असेही सांगण्यात आले आहे.लसीकरणासाठी एनजीओना आवाहन-या कालावधीत मद्यविक्री दुकाने बंद राहतील. शहर व ग्रामीण भागात केंद्रांवर ज्येष्ठांचे कोविड लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्रापर्यंत ज्येष्ठांना पोहचविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाने केले-अत्यावश्यक सेवा बँक, पोस्ट, मेडिकल स्टोअर्स, शासकीय व खासगी रुग्णालये, सुरू राहातिल शक्य असल्यास दहा दिवस घरा बाहेर पडावे लागणार नाही, असे निर्णय घेण्याचे आवाहनही डापकर यांनी केले आहे