कंधारच्या व्यापारी संकुलाचे नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांच्या हस्ते भूमिपूजन

कंधार ;प्रतिनिधी

अनेक वर्षापासून राजकीय वादात अडकून पडलेल्या कंधार शहरातील व्यापारी संकुलाच्या बांधकामाचा तिढा सुटला आहे. नगराध्यक्षा सौ. शोभाताई नळगे यांच्या हस्ते बुधवारी दि.२४ रोजी भूमिपूजन करण्यात आले.

नऊ वर्षा पूर्वी दि. २४ एप्रिल २०१२ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत कंधार शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली चार दशकाची बाजारपेठ हटवण्यात आली. यात तीन तीन मजली प्रतिष्ठाने उध्वस्त करण्यात झाली होती. अडचणीत आलेल्या दुकानदारांसाठी शहरात व्यापारी संकुल उभारण्यापेक्षा राजकीय नेत्यांनी वाद करत नऊ वर्ष हा मुद्दा लटकावून ठेवला. खा. प्रताप पाटील चिखलीकर हे व्यापारी संकुल बिओटी तत्वावर बांधायचे यावर ठाम होते.तर माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे पालिकेच्या वतीने व्यापारी संकुल उभारायचे यावर ठाम राहिल्याने हा तिढा वाढतच गेला.

गाळे बांधकामासाठी काही प्रमाणात आलेला निधीही परत गेला. गाळे बांधकामासाठी पालिका सभागृहात जवळपास सात वेळा ठरावही झाले. जिल्हाधिकारी यांच्यापासुन ते सत्ता असूनही बहुमत नसलेल्या अरविंदराव नळगे यांच्याकडे खा. चिखलीकर गटाचे काही नगरसेवक आल्याने हा प्रश्न मार्गी लागला.

पालिकेच्यावतीने गाळे बांधकाम करण्यासाठी निविदाची मुख्याधिकारी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांनी सविस्तर कायदेशीर मांडणी केली. त्यामुळे हा अडथळा दूर झाला.यानंतर बुधवार दि. २४ मार्च रोजी दुपारी नगराध्यक्षा सौ.शोभाताई नळगे यांनी गाळे बांधकामांचे भूमिपूजन केले.अशी माहीती माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे यांनी नगरपालीकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परीषदेत दिली.

यावेळी व्यापारी संकुलाच्या शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, आशाताई शिंदे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, प्रभारी मुख्याधिकारी विजय चव्हाण, नगरसेवक सुधाकर कांबळे, मन्रान चौधरी, शहाजी नळगे, दीपक आवाळे. वर्षाताई कुंटेवार, ज्योतिताई नळगे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर डॉ. दीपक बडवणे, अनिता कदम, अरुण बोघनकर, रामराव पवार, अॅड. बाबुराव पुलकुंडवार ,राजकुमार केकाटे,बालाजी चुकलवाड,यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *