चिऊ… चिऊ.. ये .. वाचक प्रतिक्रिया

प्रिय अनिता दाणे मॅडम,
सस्नेह नमस्कार.
चिऊ… चिऊ.. ये हा लेख वाचला .पक्ष्यांवरील अद्वितीय प्रेमाचा साक्षात्कार घडला.पक्षी तज्ज्ञ सलिम अलीची आठवण सदगदीत झाली.

*आपण निष्ठेने आणि व्रतस्थ वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य साकार करत आहात आणि स्वतःला ज्ञान समृद्ध करीत आहात .. प्रतिभेच्या आणि कल्पक ज्ञान निर्माणाच्या या सर्वोत्कृष्ठ यशाचा मला असीम आनंद झाला आहे..!*
*ज्ञानाची अविरत साधना आणि अध्यापनाची अखंड आराधना माणसाला आभाळा एवढ्या उंचीवर नेऊन विलोभनीय सात्विक सन्मानाच्या ज्ञान क्षितीजाचे दर्शन घडवून आणते… तुम्ही त्या पात्रता सिद्ध करून शिक्षक पदाची महत्ता आणि गुरुसंस्कृतीचे असाधारणत्व सोदाहरण साक्षात करून दाखवत आहात … माणसाच्या लौकिकाची उंची तो कोणत्या पदावर आहे यातून सिद्ध होत नाही तर त्याने केलेल्या सृजनशील अविष्कारातून साकार होते…!*
*शिक्षक कभी सामान्य नही होता … निर्माण और सृजन उसके गोद मे जन्म लेते है। आर्य चाणक्य नावाच्या प्राचीन काळातील एका शिक्षकाच्या या सिद्धांताला तुम्ही प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवत आहात .!*
*आपल्या या ज्ञान साधनेचे आणि त्या उंचीवरून जाऊनही आपल्या अंगी असलेल्या विनम्रतेचे मी हार्दिक अभिनंदन करतो . आपण पुढील समर्थ ज्ञान साधनेतून आणि शैक्षणिक अनुसंधानातून राष्ट्रीय स्तरावरील एक उतुंग शैक्षणिक संशोधक म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मीआपल्याला शुभकामना देतो*

आपण शिक्षणक्षेत्राला वाहून घेतलेले अवलिया शिक्षिका आहात

आपली शोधक नजर व सुक्ष्मातिसुक्ष्म टिपणारी निरीक्षण शक्ती कौतुकास्पदच आहे. आदरणीय मॅडम शब्दरत्नांतील आपला हातखंडा अजोड आहे. आपल्या लिखाणाच्या ज्ञानाच्या शक्तिची गरुडभरारी आजच्या विज्ञान युगातील अत्याधुनिक ‘ब्रम्होस’ सारख्या अस्त्रालाही लाजवून चूर करणारी आहे.आपली शिक्षणक्षेत्रावरील भक्ती* आणि श्रद्धा क्षणभर खाली मान तुकवायला लावणारी *आहे.याबाबतीत आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.

       *आपला नम्र*

चव्हाण गणपत नारायणराव

https://yugsakshilive.in/?p=9687

2 thoughts on “चिऊ… चिऊ.. ये .. वाचक प्रतिक्रिया

  1. Hi!

    I came across with yugsakshilive.in and thought you may be interested in our services.

    After 19 Years Of Making Diet Products, We’ve Finally Created The Best. Lose Weight Faster with the new 3 in 1 formula. Why are you waiting on the body of your dreams? – Worldwide shipping, 100% Satisfaction Guaranteed! Thousands of satisfied customers.

    Order now and obtain an enormous discount and free samples. Don’t waste your time – Make the smart choice right now and discover your new body.

    ORDER NOW! https://pharmil.com/order-orlistat-online-en.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *