लोहा /शहर.प्र.शिवराज दाढेल लोहेकर.
गेल्या वर्षभराहुन ही अधिक काळापासून पूर्ण जगा सह आपल्या देशात कोरोना संसर्गजन्य महामारी रोगाने हहंकार माजवला असून यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत कोरोनाचे रुग्ण दिवसेदिवस कमी होत होते परंतु आता गेल्या फेब्रुवारीपासून ते सध्याच्या स्थितीत
चालू मार्च महिन्यामध्ये कोरोनाने पुन्हा तोंडवर काढले असून त्याने उग्र रूप धारण केल्यासारखे देशाच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यात नांदेड जिल्ह्यात व तसेच लोहा शहर तालुक्यातील सध्या कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे तरी लोहा शहर व तालुक्यातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच कोरोना सारख्या आजाराला दूर करण्यासाठी शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान लोहा नगरपालिकेचे नगरसेवक नबीसाब शेख यांनी केले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरिकांनी सहभाग घेत लोहा शहर व तालुक्यातील नागरिकांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये गरज पडल्यास म्हणजेच अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावे घराबाहेर पडताना सदैव तोंडावर मास्क लावावा तसेच तोंडाला व नाकाला हाताने पर्स करू नये सतत साबणाने हात धुवावेत व सॅनिटायझर चा वापर करावा सोशल डिश टेशन चे पालन करावे असेही आव्हान ही नगरसेवक नबीसाब शेख यांनी केले आहे.